35 वर्षांनीही प्रचंड लोकप्रिय ! प्रत्येक कपलच्या प्ले लिस्टमध्ये हमखास असतं हे गाणं, अमेरिकन लोकगीतावरून आहे प्रेरित
प्रख्यात गायक कुमार सानू यांनी जेव्हा वृंदावन येथील प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमाला भेट दिली, तेव्हा त्यांनी महाराजांच्या उपस्थितीत ३५ वर्षांपूर्वीचे त्यांचे एक अतिशय लोकप्रिय गाणे गायले. 'जुर्म' (Jurm) चित्रपटातील हे अजरामर गाणे एका अमेरिकन लोकगीतावरून प्रेरित असल्याचं मानलं जातं. आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्य हे हमखास असतंच.

देश-विदेशातील असंख्य भाविक प्रेमानंद महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावन येथील त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात. सामान्य नागरिक असो किंवा बिझनेस, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज, तेही वेळोवेळी प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे येतात. क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हेही अनेक वेळा आश्रमाला भेट देतात.त्यांच्यानंतर, आता प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये कुमार सानू हे, खुद्द प्रेमानंद महाराजांच्या उपस्थितीत आपल्या आवाजाची जादू दाखवताना दिसले. हा व्हिडिओ पुन्हा एकदा ट्रेंड होताना दिसत आहे.
प्रेमानंद महाराजांसमोर गायल सदबाहर सुपरहिट गाणं
कुमार सानू हे आश्रमात पोहोचल्यावर एका शिष्याने त्यांची ओळख करून दिली आणि त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 27 हजारांहून अधिक गाणी गायल्याचंही त्याने नमूद केलं. त्यानंतर कुमार सानू यांनी अत्यंत नम्रपणे प्रेमानंद महाराज यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यासमोर ‘जुर्म’ (Jurm) चित्रपटातील ‘जब कोई बात बिगड जाये’ हे सुप्रसिद्ध गाणं सादर केलं. मी केवळ महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, जेणेकरून मला माझं काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पुढेही करता येईल, असं त्यांनी नंतर नम्रपणे सांगितलं.
35 वर्षांनीही फिकी नाही झाली या रोमँटिक गाण्याची जादू
1990 साली आलेल्या मधील ‘जुर्म’ (Jurm) या चित्रपटातील हे रोमँटिक गाणे अतिशय लोकप्रिय असून बहुतांश लोकांना ते आवडतं. मात्र याच या गाण्याची चाल अमेरिकन लोकगीत ‘500 माईल्स’ (500 Miles) पासून प्रेरित असल्याचे मानले जाते. असं असलं तरीही भारतीय संगीत आणि या गाण्याच्या सुमधरु शब्दांनी, चालीने, त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. कुमार सानू आणि साधना सरगम यांनी या गाण्याला आपला गोड आवाज दिला असून, प्रसिद्ध गीतकार इंदीवर यांनी याचे बोल लिहिले आहेत. संगीतकार राजेश रोशन यांनी या गाण्याची चाल तयार केली, ज्यामुळे हे गाणं अत्यंत अविस्मरणीय बनलं.
महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या या जुर्म चित्रपटात विनोद खन्ना आणि मीनाक्षा शेषाद्री यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं. दोन्ही कलाकारांच्या शानदार केमिस्ट्रीमुळे ते आणखीनच खास बनलं. गाण येऊन 3 दशकं उलटून गेली तरी आजही ते अनेकांचं आवडतं प्रेमगीत असून बऱ्याच जणांच्या प्लेलिस्टमध्ये ते हमखास असतंच.