AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात चौथी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. कुकच्या 18 पदांसाठी ही भरती असून, थेट सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. अर्ज स्पीड पोस्टद्वारे 10 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा.

चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
aurangabad high courtImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 25, 2026 | 10:26 AM
Share

फक्त चौथी पास आहात? अन् नोकरी मिळत नाही? आता टेन्शन घेऊ नका. चौथी पासांसाठी खुश खबर आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात चौथी पासांसाठी नोकरीची संधी आहे. औरंगाबाद न्यायालयात स्वयंपाक्याचे पद रिक्त आहेत. एकूण 18 पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे नोकरीसाठी केवळ चौथी पास असणं महत्त्वाचं आहे. तसेच उमेदवाराला मराठीसह हिंदीचं उत्तम ज्ञान आवश्यक आहे. या पोस्टसाठी ऑनलाईनद्वारे नाही तर स्पीडपोस्टानेही अर्ज करता येणार आहे. 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज पोहोचणं आवश्यक आहे.

किती पदांसाठी भरती?

कुक म्हणजे स्वयंपाक्याचे 18 पदे भरण्यात येणार आहेत. एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून त्यात दिव्यांगासाठी एक पोस्ट रिक्त ठेवण्यात आली आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक यादी तयार केली जाणार आहे.

चौथी पास असणं आवश्यक

कुक पदासाठी उमेदवाराला चौथी पास असणं आवश्यक आहे. सोबतच त्याला हिंदी आणि मराठी उत्तम येणं आवश्यक आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थ बनवता आले पाहिजे. म्हणजेच केवळ शिक्षण असून चालणार नाहीये, तर कुकिंगचा अनुभवही आवश्यक आहे.

कुकिंग कोर्स असणाऱ्यांना प्राधान्य

एखाद्या संस्था किंवा क्लासमधून कुकिंगचा कोर्स करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यासाठी त्याच्याकडे कुकिंगचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच थ्री किंवा फाइव्ह स्टार हॉटेलात कुक किंवा शेफ म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणाऱ्यांनाही पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे.

अर्ज कोण करू शकतं?

या पदासाठी सामान्य वर्गातील 18 ते 38 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. तर मागास वर्गातील उमेदवारांना वयाची सूट देण्यात आली आहे. या वर्गातील 43 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. दरम्यान, न्यायालय किंवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वयाची काही अट नाहीये.

अर्ज कसा कराल?

या पदासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. स्पीड पोस्टानेच अर्ज करावे लागणार आहेत. या अर्जासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात आलेलं नाही. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी 200 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

उमेदवारांनी सर्वात आधी मुंबई हायकोर्टाच्या bombayhighcourt.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरतीशी संबंधित नोटिफिकेशन पाहायचं आहे. त्यानंतर तिथे दिलेला फॉर्म डाऊनलोड करायचा आहे.

त्यानंतर फॉर्म काळजीपूर्वक भरल्यानंतर उमेदवाराला त्यात आपली शैक्षणिक माहिती क्रमानुसार भरायची आहे.

तसेच फॉर्ममध्ये दिलेल्या जागेवर रंगीत फोटो लावायचा आहे.

तसेच प्रबंधक (प्रशासन) मुंबई हायकोर्ट, बेंच औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – 431009 या पत्त्यावर स्पीडपोस्टने अर्ज पाठवायचा आहे.

हे कागदपत्रेही पाठवा

अर्ज पाठवताना शैक्षणिक पात्रतेची मार्कशीट, जन्माचा दाखला, जातीचं प्रमाणपत्र, आवश्यकता असेल तर दिव्यांग असलेलं प्रमाणपत्र, निवासाचा दाखला, कुक असल्याच्या अनुभवाचं प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्र जोडायचे आहेत. तसेच चारित्र्याचा दाखला, कौटुंबिक घोषणा पत्र आणि जर सरकारी कर्मचारी असेल तर संबंधित कार्यालयाची एनओसी द्यावी लागणार आहे. तसेच तुम्हाला कोणते पदार्थ बनवता येतात अशा पाच पदार्थांची नावे लिहायची आहेत. तसेच पाच रुपयाचे डाक तिकीट लावून हा अर्ज पाठवायचा आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला