
कच्चा बदाम या व्हायरल झालेल्या गाण्यामुळे अंजली अरोरा रातोरात स्टार झाली. तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. त्यानंतर अंजली अभिनेत्री कंगान रणौतचा रिअॅलिटी शो लॉक अपमध्ये सहभागी झाली. अंजली अरोरा रातोरात स्टार बनली. पण सध्या अंजली एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. अंजलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अंजली थायलंडमधील एका क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
व्हायरल व्हिडीओ आणि करिअर बदलाची चर्चा
या व्हिडीओमध्ये अंजली क्लबच्या डान्स फ्लोअरवर ओ साकी साकी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिने चमकदार पेस्टल रंगाचा हॉल्टर-नेक क्रॉप टॉप आणि हाय-स्लिट स्कर्ट परिधान केला आहे. व्हिडीओमध्ये तिच्यासोबत काही बॅकग्राऊंड डान्सर्सही दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी असा अंदाज लावला आहे की, अंजलीने हाय-एंड क्लब्समध्ये डान्सिंग हे करिअर म्हणून स्वीकारले आहे. मात्र, अंजलीने या करिअर बदलाच्या दाव्यांवर अद्याप कोणतेही प्रतिक्रिया दिलेले नाही.
वाचा: अमाल मलिक ते प्रणित मोरे; पाहा बिग बॉस 19मध्ये दिसणाऱ्या कलाकारांची यादी
Anjali Arora of Kachcha Badam fame has taken up dancing in posh clubs as a career it seems.
Here she is dancing at a Club in Pattaya, Thailand. pic.twitter.com/RXgWZit44Z
— Sensei Kraken Zero (@YearOfTheKraken) August 21, 2025
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्सनी तिच्या कथित करिअर बदलावर टीका केली आहे, तर काहींनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. एका युजरने लिहिले, “जेव्हा दुआ लिपा डान्स करते, तेव्हा कोणी काही बोलत नाही, उलट तिचे कौतुक केले जाते. पण जेव्हा आपली रॉकस्टार अंजली अरोरा पटायामधील क्लबमध्ये डान्स करताना दिसते, तेव्हा आपण आपले डोके नको तिकडे लावतो. का? ही वसाहतिक मानसिकता आहे का?”
दुसऱ्या एका युजरने X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “व्हायरल फेमची शेल्फ लाइफ फक्त 1-2 वर्षे असते. त्यातून जास्तीत जास्त फायदा मिळवून व्यवसाय सुरू करावा किंवा आदरणीय करिअर निवडावे लागते. अन्यथा दुबईच्या फ्लाइट्स किंवा पट्टायामध्ये डान्स करणे हेच उपजीविकेचे मार्ग उरतात.”
याउलट, अंजलीच्या समर्थनार्थ एका युजरने लिहिले, “तुम्हाला नेमके तिला काय करायला सांगायचे आहे? आणि तिने तुमच्यासारख्या अपयशी व्यक्तीचे ऐकावे का? तुम्ही तुमच्या आयुष्यात काय साध्य केले आहे की कोणाला उपदेश द्यावा? ती प्रामाणिकपणे उपजीविका करत आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवत नाही. डान्स हे तिचे सर्वोत्तम कौशल्य आहे. ती आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करत आहे.”