AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायात साधी चप्पल घालून राशन खरेदी, प्रसिद्ध गायकाचा साधेपणा, चाहते म्हणाले, तुस्सी ग्रेट हो पाजी

Arijit Singh : अरिजित सिंगचा आवाज जितका मधुर आहे तितकंच साधं त्याचं मनही आहे. अलीकडेच त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्कूटीवरून सामाना आणायला जाताना दिसत आहे.

पायात साधी चप्पल घालून राशन खरेदी, प्रसिद्ध गायकाचा साधेपणा, चाहते म्हणाले, तुस्सी ग्रेट हो पाजी
Image Credit source: instagram
| Updated on: Jun 01, 2023 | 4:48 PM
Share

Arijit Singh Viral Video : बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजित सिंगने (Arijit Singh) आपल्या दमदार आवाजाच्या जोरावर लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. अरिजितला त्याच्या आवाजासोबतच त्याच्या साधेपणासाठीही पसंती दिली जाते. आता त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये इंडस्ट्रीतील हा प्रसिद्ध गायक अतिशय साध्या लूकमध्ये दिसत आहे, त्याचा साधेपणा पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.

अरिजित सिंग आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. त्याचा दमदार आवाज हीच त्याची खणखणीत ओळख आहे. या लोकप्रिय गायकाच्यासुरेल आवाजाचे आज लाखो चाहते आहेत. अरिजीतने गायलेले जवळपास प्रत्येक गाणे हिट आहे. या टप्प्यावर पोहोचल्यानंतर यश अनेकांच्या डोक्यात जातं, पाय जमिनीवर रहात नाहीत. पण अरिजीतचं तसं नाही. तो अतिशय डाऊन टू अर्थ आहे. त्याच्या सुरेल आवाजासोबतच तो त्याच्या शांत स्वभावासाठीही लोकांना आवडतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल होत असून त्याच्या साधेपणाने त्याने लोकांचे मन जिंकलं आहे.

सामान आणायला स्कूटरवर निघाला होता गायक

या व्हिडिओमध्ये अरिजित सिंग हातात बॅग घेऊन असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तो किराणा सामान घेण्यासाठी जाताना दिसतो. अशा स्थितीत गायक आपल्या परिसरातील लोकांशी बोलत तेथून जातो. या व्हिडिओमध्ये त्याचा अतिशय साधा लूक, त्याचे कपडे, पायात घातलेली चप्पल पाहून चाहते त्याच्या साधेपणावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आजूबाजूच्या लोकांशी बोलून गायक तिथून त्याच्या स्कूटीवरून निघून जातो.

विनम्र स्वभावामुळे जिंकतो लोकांचं मन

अरिजितच्या या साधेपणावर चाहते खूप प्रेम करत आहेत. इंडस्ट्रीतील सर्वोच्च गायकांपैकी एक असलेल्या अरिजितला या लूकमध्ये पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, ‘एक ही तो दिल है कितनी बार जीतोगे, अरिजित सिंग.’ दुसऱ्याने लिहिले, ‘त्याने यशाची शिखरे गाठली आणि तरीही त्याचे पाय जमिनीवरच आहेत.. नाही तर काही सेलिब्रिटी 4 किंवा 5 हिट गाण्यांनंतर खाली बघतच नाहीत.

अरिजित सिंग यांचा जन्म मुर्शिदाबादमधील जियागंज येथील पंजाबी शीख कुटुंबात झाला होता. 2005 मध्ये तो रिअॅलिटी शो फेम गुरुकुल आणि इतर अनेक शोमध्येही दिसला होता. नंतर 2013 मध्ये आशिकी 2 चित्रपटात ‘तुम ही हो’ आणि ‘चाहूं मैं या ना’ सारखी गाणी गायल्यानंतर त्याचे नशीब उजळले आणि तो इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध गायक बनला.

कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले.