AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लंडनमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानशी गैरवर्तन; अखेर गार्डने तिला घट्ट धरलं अन्….धक्कादायक व्हिडिओ

लंडनमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत गैरवर्तनाचा एक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती प्रचंड गर्दीत अडकलेली दिसत आहे.

लंडनमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानशी गैरवर्तन; अखेर गार्डने तिला घट्ट धरलं अन्....धक्कादायक व्हिडिओ
mahira khanImage Credit source: instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: May 27, 2025 | 3:42 PM
Share

भारतात पाकिस्तानी स्टार्ससाठी नो एन्ट्री बोर्ड सध्या लावण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तेथील सर्व सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही बंदी घातली आहे. तथापि, तिथून अनेक स्टार इतर देशांमध्ये येत-जात राहतात. दरम्यान, प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा लंडनमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. लंडनमध्ये माहिरा खानशी गैरवर्तन झाल्याचा आणि त्यामुळे तिची झालेली अवस्था याचा हा व्हिडिओ असून आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लंडनमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानशी गैरवर्तन

सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओमध्ये माहिरा खान प्रचंड गर्दीत अडकल्याचं दिसून येतं आहे. तिच्या आजूबाजूला शेकडो लोकांनी गर्दी केल्याच पाहायला मिळत आहे. या गर्दीत ती अडकली असून तिथून कसा तरी बाहेर निघण्याचा प्रयत्न ती करत असल्याचं दिसत आहे. या गर्दीत काही लोकांनी माहिराशी गैरवर्तन केल्याचंही वृत्त आहे. व्हिडिओमध्ये, पाकिस्तानचा ज्येष्ठ अभिनेता हुमायून सईद देखील तिच्या मागे दिसत आहे, जो ही सर्व परिस्थिती पाहून काळजीत असल्याचं दिसत आहे. मात्र गर्दीपासून सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी माहिराला घेरलेले दिसत आहे.

गार्डने अचानक तिला पकडल्यानंतर माहिरा खान अस्वस्थ माहिरा खान तिच्या आगामी ‘लव्ह गुरू’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लंडनला गेली होती. तिथे तिच्यासोबत गर्दीचा फायदा घेत गैरवर्तन झाल्याचं म्हटल जात आहे. व्हिडिओ पाहून असे दिसून येते की हे सर्व लोक तिची एक झलक पाहण्यासाठी तेथून हलण्यास तयारच नव्हते. दरम्यान, गार्डने तिला घट्ट धरलं होत पण यामुळे माहिरा जास्तच अस्वस्थ झाल्याचं दिसत होती.

शाहरुखसोबत डेब्यू माहिरा खानने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. ती शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात दिसली होती.2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. शाहरुखसोबतचा तिचा बॉलिवूड डेब्यू यशस्वी झाला होता आणि चित्रपट देखील हिट झाला. हा चित्रपट सुमारे 92 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, तर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर त्याने 190.95 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या चित्रपटाने जगभरात तब्बल 281.45 कोटी रुपये कमावले.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?