अनुष्काने मिठी मारताच विराट बाळासारखा ढसाढसा रडला, RCB च्या विजयानंतरचे भावनिक क्षण व्हायरल

आयपीएल 2025 चा अंतिम सामन्यात आरसीबीने आयपीएल 2025ची ट्रॉफी जिंकली आहे. हा क्षण सर्वच टीमसाठी आनंदाचा आणि अद्भुत होता. विराट कोलही देखील या क्षणी फारच भावूक झालेला दिसला. तसेच अनुष्काने जेव्हा त्याला आनंदाने मिठी मारली तेव्हा तर तो ढसाढसा रडू लागला.

अनुष्काने मिठी मारताच विराट बाळासारखा ढसाढसा रडला, RCB च्या विजयानंतरचे भावनिक क्षण व्हायरल
Virat hugged Anushka Sharma and cried after RCB victory in IPL
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2025 | 1:03 AM

आयपीएल 2025 चा अंतिम सामना (3 जून 2025) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळण्यात आला. एका रोमांचक सामन्यात आरसीबीने ट्रॉफी जिंकली. RCBच्या विजयानंतर सर्व टीमने जल्लोष करत हा आनंद साजरा केला. स्टेडियमवर RCBचे सर्व खेळाडू आनंदी तर दिसतच होते पण सोबतच सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

RCBच्या विजयानंतर विराट कोहली भावूक

RCBच्या विजयानंतर सर्वात जास्त भावूक झालेला दिसला तो म्हणजे विराट कोहली. पहिल्यांदा आयपीएल जिंकल्यानंतर विराट कोहलीला इतका आनंद झाला की अक्षरश: तो त्या क्षणी मैदानावर ढसाढसा रडू लागला. विराटने सर्व खेळाडूंना मिठी मारत आनंद साजरा केला पण तेव्हा त्याच्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबत नव्हते. त्यावेळी मॅच पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये उपस्थित असलेली अनुष्का शर्माही जोरजोरात उड्या मारून आनंद व्यक्त करताना दिसली.

अनुष्काने मिठी मारताच विराट ढसाढसा रडू लागला 

पण खरा क्षण तेव्हा पाहायला मिळाला जेव्हा अनुष्का धावत मैदानावर उतरली आणि तिने विराटला घट्ट मिठी मारली, त्यावेळी, तिच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. तिने विराटला मिठी मारताच विराट एखाद्या बाळासारखा ढसाढसा रडू लागला. ज्याचे फोटो  आणि  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. अनुष्का शर्मानेही तिच्या पतीचा विजय साजरा केला. प्रथम ती टाळ्या वाजवताना आणि नंतर क्रिकेटपटूला मिठी मारताना आणि विजयाबद्दल अभिनंदन करताना दिसली.


18 वर्षांत पहिल्यांदाच आयपीएल जिंकली RCB

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन बनली आहे. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. आरसीबीने प्रथम खेळल्यानंतर 190 धावा केल्या तर पंजाब किंग्जने फक्त 184 धावा केल्या. RCB चा विजय कायम लक्षात राहणारा ठरला.

विजयानंतर विराटची प्रतिक्रिया 

विजयानंतर विराट कोहलीने प्रतिक्रिया देत म्हटलं की, ‘हा विजय चाहत्यांसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो संघासाठी आहे. मी या संघाला माझे सर्वस्व, शौर्य आणि अनुभव दिला आहे. प्रत्येक हंगामात जिंकण्याचा प्रयत्न केला, मी शक्य तितके सर्व काही दिले. हा दिवस येईल असे कधीच वाटले नव्हते, पण जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा मात्र मी भाविनक झालो.” असं म्हणत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.