विराट कोहली-अनुष्का शर्माची मुलगी वामिकाचा पहिला फोटो समोर, नेटकरी म्हणतात… ही तर सेम ‘विरूष्का’ची कॉपी

काही दिवसांआधी अनुष्काने आपल्या लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात ती खूपच गोड दिसत होती. तसंच विराटनेही आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला होता. या दोघांच्या लहानपणीच्या फोटोंची तुलना आता वामिकाशी केली जात आहे. 'वामिका सेम टू सेम विरूष्काच्या लहानपणीच्या फोटोंसारखी दिसते', असं नेटकरी म्हणताहेत.

विराट कोहली-अनुष्का शर्माची मुलगी वामिकाचा पहिला फोटो समोर, नेटकरी म्हणतात...  ही तर सेम विरूष्काची कॉपी
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 12:14 PM

मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) आणि विराट कोहली (virat kohali) यांची मुलगी वामिकाचा नुकताच (vamika) पहिला वाढदिवस साजरा झाला. मात्र तिचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत नव्हते. आता वामिकाचे काही फोटो आता समोर आलेत. काल (रविवार) भारत आणि साउथ आफ्रिका मॅच खेळली जात होती. त्यावेळी स्टेडिअममध्ये अनुष्का आली होती. तिच्यासोबत वामिकादेखील पहायला मिळाली. त्यावेळी वामिका कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर वामिकाच्या फोटोंची विराट आणि अनुष्काच्या लहानपणीच्या फोटोंची नेटकऱ्यांनी तुलना केली. विराट-अनुष्का लहानपणी दिसायचे तसंच वामिका आता दिसते, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या पहायला मिळत आहेत.

वामिकाने यावेळी पिंक कलरचा फ्रॉक घातला होता. ती आपल्या आई अनुष्कासोबत पहायला मिळाली. पहिल्यांदा वामिकाचे फोटो पहायला मिळाले.

वामिका- विराट, अनुष्काची कॉपी

काही दिवसांआधी अनुष्काने आपल्या लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात ती खूपच गोड दिसत होती.

 

 

विराटनेही आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला होता.

या दोघांच्या लहानपणीच्या फोटोंची तुलना आता वामिकाशी केली जात आहे. ‘वामिका सेम टू सेम विरूष्काच्या लहानपणीच्या फोटोंसारखी दिसते’, असं नेटकरी म्हणताहेत.

विराट आणि अनुष्काने मानले फोटोग्राफर्सचे आभार

अनुष्का वामिकाला घेऊन जेव्हा स्टेडिअममध्ये गेली तेव्हा फोटोग्राफर्सने वामिकाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुष्काने विनंती केली की, ‘कृपया तिचा फोटो काढू नका.’ फोटोग्राफर्सनेही तिचं म्हणणं ऐकत फोटो काढले नाहीत, तेव्हा अनुष्का आणि विराटने फोटोग्राफर्सचे आभार मानलेत.

संबंधित बातम्या

Siddharth Mitali Wedding Anniversary : सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

प्रियंका आणि निकच्या मुलाचा पहिला फोटो तुम्ही पाहिला का ?

Happy Birthday : बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी रिया सेन आज बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री!