मुंबई – प्रियंका (priyanka) आणि निकच्या (nick) मुलाची चर्चा काही दिवसांपासून होतं आहे. अनेक बातम्या लोकांच्या कानावर पडल्या, पण प्रियंका सरोगसी (Surrogacy) पध्दतीने आई झाली असल्याचे चाहत्यांना सांगितले होते. प्रियंका आणि निकला मुलगी झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. तसेच निकचा आपल्या मुलीचासोबतचा एक फोटो इंन्स्टाग्रामवर नुकताच शेअर झाला आहे. फोटो शेअर होताच अनेकांनी त्यावर कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच फोटो त्यांच्या चाहत्यांनी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नानंतर अमेरिकेत वास्तव करत असलेल्या प्रियंकाचे चाहते भारतात सुध्दा प्रियंकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या असून, फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळते.
View this post on Instagram
View this post on Instagram
निक जोनस यांच्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रावर शेअर झाल्यानंतर तो काही तासातच व्हायरल झाला आहे. प्रियांकाने ज्यावेळी आई झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते, तेव्हा तिच्या चाहत्यांनी सुध्दा तिला शुभेच्छा दिल्या होत्या. आमच्या मुलाने आम्हाला त्याच्या रूपात गिफ्ट दिलं आहे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्याची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते खूप आतूर झाले आहेत. सद्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो फोटो व्हायरल झाला आहे, त्या फोटोवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
चाहत्यांच्या शुभेच्छा
फोटो शेअर होताचं जगभरातील निक जोनच्या आणि प्रियंका चोप्रा यांच्या चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत, त्याचबरोबर बाळाचं सुध्दा स्वागत केलं आहे. निकने बाळाला उचलून घेतल्याचे फोटोत दिसत आहे. पण काही चाहत्यांच्या मते हा जुना फोटो असून तो व्हायरल होतं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.