AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 वर्षांपूर्वी तुटलं नातं, पण जखमा अजूनही ताज्या… ऐश्वर्यासोबतच्या नात्यावर काय म्हणाला विवेक ओबेरॉय ?

Vivek Oberoi on past relationship : विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचं नातं आणि ब्रेकअपने अभिनेत्याला खूप त्रास दिला होता.त्या नात्यावरूनही त्याचे सलमान खानसोबत भांडण झाले होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत विवेकने भूतकाळातील काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

20 वर्षांपूर्वी तुटलं नातं, पण जखमा अजूनही ताज्या... ऐश्वर्यासोबतच्या नात्यावर काय म्हणाला विवेक ओबेरॉय ?
Image Credit source: social media
| Updated on: May 16, 2023 | 12:59 PM
Share

मुंबई : जेव्हा सलमान खानच्या (Salman Khan)प्रेमप्रकरणांचा विषय निघतो, तेव्हा ऐश्वर्या रायचे (Aishwarya Rai)नाव नक्कीच प्रथमस्थानी येते. या दोघांची प्रेमकहाणी ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर सुरू झाली आणि या कथेचा शेवट खूप दुःखद झाला. या प्रेमकथेशी आणखी एक नाव नेहमीच जोडले गेले आहे आणि ते म्हणजे अभिनेता ‘विवेक ओबेरॉय’चे (Vivek Oberoi). सलमानपासूनचे अंतर वाढल्यानंतर ऐश्वर्या अभिनेता विवेक ओबेरॉयच्या प्रेमात पडली होती, पण त्यामुळे विवेकला सलमानच्या रोषाला सामोरे जावे लागले.

बरं, या सगळ्या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत, पण विवेकने त्याच्या करिअरच्या शिखरावर असताना पाहिलेल्या समस्या आजही त्याला सतावतात. नुकतेच विवेकने त्याच्या भूतकाळातील आयुष्याबद्दल एका मुलाखतीत त्याच्या मनातील विचार सांगितले.

विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्याची जवळीक सलमान खानला सतावत होती. अशा परिस्थितीत, एकदा सलमानने खूप गोंधळ घातला होता आणि विवेकने सार्वजनिकपणे अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. सलमानशी पंगा घेतल्याचा परिणाम विवेकच्या करिअरवर दिसून आला. त्याच वेळी, काही काळानंतर ऐश्वर्या आणि विवेक 2003 मध्ये वेगळे झाले. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनला आपला जोडीदार बनवले होते. त्याचवेळी विवेकने कुटुंबाच्या पसंतीने प्रियंका अल्वासोबत लग्न केले.

सगळं चांगलं होतं पण काम मिळत नव्हतं…

विवेक ओबेरॉयने अलीकडेच एका मुलाखतीत आपल्या भूतकाळाबद्दल सांगितले. विवेक म्हणाला, “मी अशा टप्प्यातून गेलो आहे जेव्हा एक संपूर्ण लॉबी माझ्या विरोधात काम करत होती. शक्तिशाली लोक मला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मी ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ चित्रपट केला आणि त्यासाठी माझी खूप प्रशंसा झाली आणि मला पुरस्कारही मिळाले. पण तरीही माझ्याकडे चित्रपट घेऊन कोणी येत नव्हते. माझा आधीच चित्रपट चांगला चालला होता अभिनेता म्हणून माझे कौतुक होत होते पण तरीही माझ्याकडे काम नव्हते.”

एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायमुळे त्याच्या व्यावसायिक जीवनावर परिणाम झाला आहे का? असा प्रश्न विवेकला विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला की ‘मी आता या प्रश्नावर काहीही बोलणार नाही कारण आता सर्व काही संपले आहे. पण मला प्रत्येक तरुणांना सांगायचे आहे की हे सर्वत्र घडते. प्रतिभेवर हल्ला होतो पण तुम्ही तुमच्या कामासाठी समर्पित असाल तर कोणीही तुमचे नुकसान करू शकत नाही. समोर येणा-या समस्यांना घाबरू नका आणि कामावर लक्ष केंद्रित करा.”

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.