AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 18 Winner LIVE: इजिप्तमध्ये लग्न, ख्रिश्चन असताना इस्लाम धर्म स्वीकारला; कलर्सचा प्रिय विवियन डिसेना विजेता?

Bigg Boss 18 Hindi Grand Finale & Winner LIVE Updates: बिग बॉस 18 मध्ये विवियन डिसेनने लोकप्रियता मिळवली. मॉडेलिंग आणि अभिनयापर्यंत सर्वच जण त्याच्याबद्दल जाणतात. एवढच नाही तर विवियनला कलर्स टीव्हीचा लाडकाही म्हटलं जात आहे. त्यामुळे विवियनच विजेता होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण हे खरं होतंय का हे तर ग्रँड फिनालेमध्ये बघायला मिळणारच आहे.

Bigg Boss 18 Winner LIVE: इजिप्तमध्ये लग्न, ख्रिश्चन असताना इस्लाम धर्म स्वीकारला; कलर्सचा प्रिय विवियन डिसेना विजेता?
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jan 19, 2025 | 11:24 PM
Share

जेव्हापासून सलमान खानचा शो ‘बिग बॉस 18’ सुरू झाला, तेव्हापासून विवियन डिसेना हा ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सुरू आहे. शोच्या पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’नेही विवियन शो जिंकणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता तो खरोखरच या शोचा विजेता ठरतो की नाही, याचे उत्तर आज म्हणजेच ग्रँड फिनालेमध्ये बघायला मिळणारच आहे.

2019 मध्ये त्याने इस्लाम धर्म स्वीकारला

‘बिग बॉस 18’ 15 आठवडे टीव्हीवर चालला. या शोमध्ये विवियन डिसेनाला कलर्स टीव्हीचा लाडका म्हटलं जात आहे. कारण ‘बिग बॉस’पूर्वीही विवियनने या वाहिनीवरील अनेक टीव्ही शोमध्ये काम केले होते. 2008 मध्ये ‘कसम से’ या टीव्ही शोमधून त्याने टीव्हीमध्ये पदार्पण केले. 28 जून 1988 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे जन्मलेला विवियन ख्रिश्चन धर्माचा होता, परंतु 2019 मध्ये त्याने इस्लाम धर्म स्वीकारला.

View this post on Instagram

A post shared by Vivian Dsena (@viviandsena)

मॉडेलिंगमुळे अभ्यास सोडला

विवियनच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर ती 12वी पास आहे. त्याने मुंबईतील लोकमान्य टिळक हायस्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी मध्य प्रदेशची राज्यस्तरीय परीक्षा दिली. त्याने परीक्षाही उत्तीर्ण केली होती, पण नंतर त्याला मॉडेलिंगच्या जगात संधी मिळाली आणि मग तो मॉडेल बनला. त्याच दिशेने वाटचाल करताना त्याने अभिनयाचा मार्ग स्वीकारला.

विवियनने ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’, ‘मधुबाला: एक इश्क एक जुनून’, ‘सिर्फ तुम’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. आज विवियन हे टीव्ही जगतातलं मोठं नाव आहे, पण जर तो अभिनयात नसता तर तो फुटबॉलपट्टू झाला असता. वयाच्या 10 वर्षापासून त्याला फुटबॉलमध्ये रस होता.

विवियन डिसेना याचं वैयक्तिक आयुष्य

विवियन डिसेनाने 2013 मध्ये ‘प्यार की एक कहानी’ टीव्ही शोचा को-स्टार वहबिज दोराबजीशी लग्न केले. मात्र, त्यानंतर 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 2022 मध्ये विवियनने इजिप्शियन पत्रकार असलेल्या नूरन अलीशी लग्न केलं. विवियन आणि नूरन यांची भेट एका मुलाखतीच्या निमित्तानं झाली होती, त्यानंतर दोघेही मित्र झाले आणि नंतर प्रेमात पडले आणि हे प्रेम अखेर लग्नापर्यंत पोहोचलं.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू