कोरोनामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ, ज्येष्ठ अभिनेते म्हणतायत, आज बाळासाहेब असते तर….

सोनी सब टीव्हीची मालिका ‘वागले की दुनिया’मधून (Wagle ki Duniya) 30 वर्षानंतर छोट्या पडद्यावर परतलेले ‘श्रीनिवास वागळे’ अर्थात अभिनेते ​​अंजानन श्रीवास्तव (Anjan Srivastava) पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर परतण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

कोरोनामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ, ज्येष्ठ अभिनेते म्हणतायत, आज बाळासाहेब असते तर....
अंजान श्रीवास्तव

मुंबई : सोनी सब टीव्हीची मालिका ‘वागले की दुनिया’मधून (Wagle ki Duniya) 30 वर्षानंतर छोट्या पडद्यावर परतलेले ‘श्रीनिवास वागळे’ अर्थात अभिनेते ​​अंजानन श्रीवास्तव (Anjan Srivastava) पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर परतण्यासाठी खूप उत्सुक आहेत. परंतु, या कोरोना महामारीत, त्यांचे वय त्यांच्या काम करण्याच्या इच्छे आड येते आहे. मालिकेचे निर्माते जेडी मजीठिया यांनी अंजान श्रीवास्तव आणि भारती आचरेकर यांना घरीच राहण्यास सांगितले आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक असल्याने, निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे (Wagle ki Duniya Fame Senior actor Anjan Srivastava reacted on current shooting guidelines).

अंजान म्हणाले की, एक प्रकारे आपण असे म्हणू शकतो की कोरोनाने मला घरीच कोंडून ठेवले आहे. मी काम करण्यास तयार आहे आणि मला अनेक प्रेक्षक, तसेच माझ्या चाहत्यांकडून संदेश येत आहेत की मी पुन्हा ‘वागले की दुनिया’मध्ये परतावे. त्यांना मला बघायचे आहे. तो मला खूप मिस करत आहेत. पण शोचे निर्माते मात्र खूप काळजीत आहेत.

सिल्वासामध्ये शूटिंग सुरु

‘वागले की दुनिया’ची टीम सिल्वासाच्या बायो बबलमध्ये कमीतकमी कलाकार आणि क्रू मेंबर्ससह शूट करत आहे. जेडी मजीठियाच्या या सीरियलच्या सेटवर बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. परंतु अंजान या प्रकरणात नशीबवान ठरले आहेत. कोरोना तपासणीसाठी झालेल्या चार टेस्टमध्ये ते निगेटिव्ह आढळले होते. परंतु त्यांच्या सह-अभिनेत्री भारती आचरेकर (भारती आचरेकर) यांना कोरोनाची लागण झाली होती आणि आता त्या हळू हळू बऱ्या होत आहे. भारती यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, अद्याप त्यांना अशक्तपणा जाणवतो आहे.

सरकारच्या विचारसरणीशी सहमत नाही!

अंजान यांचे म्हणणे आहे की, निर्माते आणि या शोमध्ये त्यांच्या मुलाची भूमिका साकारत असलेल्या सुमित राघवन याच्यासोबत शूट करू शकतात. पण गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ कलाकारांना काम करण्यास मज्जाव केल्याने त्यांच्यासोबतचे सीन नेमके कुठे शूट करावेत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सरकारच्या या विचारसरणीशी अंजान श्रीवास्तव अजिबात सहमत नाहीत (Wagle ki Duniya Fame Senior actor Anjan Srivastava reacted on current shooting guidelines).

कलाकार कधीच म्हातारा होत नाही!

सिनिअर वागळे यांची भूमिका साकारणारे हे कलाकार म्हणतात की, कलाकार कधीच म्हातारा होत नाही आणि जरी तो एक ज्येष्ठ कलाकार असला, तरी जर त्याने अभिनय केला नाही तर तो तसाच मारून जाईल. ते पुढे म्हणतात की या वेळी हा विषाणू तरुण पिढीवरही हल्ला करत आहे, जो आपल्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. मी गोवा आणि इतर राज्यांत शूटिंगच्या ठिकाणी वाढती प्रकरणे ऐकली आहेत आणि सर्वात वाईट परिस्थिती हैदराबादच्या भागातील आहे.

निर्मात्यांच्या काळजी कळते

ज्येष्ठ नागरिकांबद्दल सरकार आणि निर्मात्यांची चिंता अंजान यांनाही कळते आहे. परंतु, त्यांना असे वाटते की कोणत्याही वयातील कलाकार बायो बबलमध्ये सहज काम करू शकतात आणि त्यांनी अभिषेक कपूरच्या चित्रपटासाठी बायो बबलमध्ये सहजतेने काम केले आहे. ते म्हणाले की, या शूटच्या वेळी काही लोक सेटवरच होते आणि बाकी सगळे बाहेर असायचे, अगदी गरज लागले तरच सेटवर यायचे.

बाळासाहेब ठाकरेंची आठवण…

अंजान यांना या काळात बाळासाहेब ठाकरे यांची खूप आठवण येत आहे. सध्याच्या काळात उद्योग विश्वाला त्यांची सर्वात जास्त गरज आहे, असे अंजान यांना वाटते. ते म्हणाले की, आम्ही आमची विचारसरणी खूप जुळायची. कारण मी आयपीटीएशी संबंधित आहे, ते कलाकारांचा खूप आदर करत असत आणि आताच्या परिस्थितीतही त्यांनी नक्कीच काहीतरी मार्ग काढला असता. परंतु, राज्य सरकारचे कौतुक करताना ते म्हणाले की, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे.

(Wagle ki Duniya Fame Senior actor Anjan Srivastava reacted on current shooting guidelines)

हेही वाचा :

मनोरंजनाची मेजवानी मिळणार, मनोज बाजपेयीची ‘The Family Man 2’ सीरीज लवकरच प्रदर्शित होणार!

Death Rumour | नव्वदच्या दशकांत चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रीच्या निधनाच्या अफवा, चाहतेही हैराण!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI