AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tandav Poster | ‘तांडव’ वेब सीरीजचे पोस्टर प्रदर्शित, सैफ अली खानचा जबरदस्त लुक!

सैफ अली खानच्या वेब सीरीज 'तांडव' चे पोस्टर प्रदर्शित नुकतेच झाले होते. या पोस्टरमध्ये सैफ अली खानचा बॅकसाइड लूक दिसत आहे.

Tandav Poster | 'तांडव' वेब सीरीजचे पोस्टर प्रदर्शित, सैफ अली खानचा जबरदस्त लुक!
| Updated on: Dec 17, 2020 | 11:16 AM
Share

मुंबई : सैफ अली खानच्या वेब सीरीज ‘तांडव’ चे पोस्टर प्रदर्शित नुकतेच झाले आहे. या पोस्टरमध्ये सैफ अली खानचा बॅकसाइड लूक दिसत आहे. एखाद्या राजकीय नेत्यासारखा तो या पोस्टरमध्ये लोकांना अभिवादन करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे पहिला टीझर आज 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. (web series ‘Tandav’ web poster displayed, Saif Ali Khan’s stunning look)

नेटफ्लिक्सची सीरीज सेक्रेड गेम्समध्ये सरताजची भूमिका साकारून सैफने त्याच्या चाहत्यांना धक्काच दिली होता. सैफची ती पहिली वेब सीरिज होती आणि चाहत्यांनी त्याचे कौतुकही केले होते. अशातच सैफच्या अ‍ॅमेझॉनची मूळ वेब सीरीज ‘तांडव’ मुळे सैफच्या चाहत्यांमधील उत्साह आणखी वाढला आहे, असं ऐकण्यात येत आहे की, सैफची ही वेब सीरीज पॉलिटिकल ट्रिलर सीरीज ‘हाउस ऑफ कार्ड्स’ सारखी आहे.

प्राइम व्हिडिओने हे पोस्टर आपल्या इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले आणि लिहिले की, “तयार व्हा, आपण तांडव मोडमध्ये प्रवेश करणार आहोत.” जेव्हा या वेब सीरीजची घोषणा झाली तेव्हा सैफने एका निवेदनात सांगितले की, ही वेब सीरीज भारतीय राजकारणाभोवती फिरणार आहे. मात्र, वेब सीरीज ‘हाऊस ऑफ कार्ड्स’च्या धर्तीवर असूनही अमेरिकन उदाहरणे विचारात घेऊ इच्छित नसल्याचेही त्यांने सैफने सांगितले होते.

ही वेब सीरीज उत्तर प्रदेशातील राजकारण, दलित आणि यूपी पोलिसांमधील संबंध यासारख्या विविध गोष्टी यामध्ये आहेत. सैफ एक राजकारणी म्हणून दिसणार आहे. चंद्रगुप्त मौर्याचे सर्वात बुद्धिमान सल्लागार चाणक्य म्हणून त्यांने आपल्या भूमिकेचे वर्णन केले. ‘तांडव’ अली अब्बास जफर हे दिग्दर्शित करणार आहेत, ज्यांनी ‘भारत’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘गुंडे’ सारख्या अनेक बॉलिवूड हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सैफचे चाहते आता त्याच्या या वेब सीरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरीज शिवाय सैफ अली खान प्रभास स्टारर फिल्म ‘आदिपुरुष’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात सैफ रावणची भूमिका साकारत आहे.

संबंधित बातम्या : 

लवकरच ‘संजय लीला भन्साळी’ लाहोरच्या रेड लाईट एरियावर बनवणार चित्रपट!

Video: अंकिता लोखंडेचा हॉट अंदाज, मात्र सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

(web series ‘Tandav’ web poster displayed, Saif Ali Khan’s stunning look)

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला