
ऐश्वर्या राय ही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच. पण ती अमिताभ बच्चन यांची सून देखील आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा आहे. दोघांचा घटस्फोट होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. ऐश्वर्या सध्या फक्त तिच्या मुलीसोबतच वेगवेगळ्या फंक्शनमध्ये दिसतेय. त्यामुळे ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्य हे दोघेही बच्चन कुटुंबासोबत राहत नसून वेगळ्या राहत असल्याची देखील इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे. नुकताच झालेल्या अनंत अंबानीच्या विवाह प्रंसगी देखील ऐश्वर्या आपली मुलगी आराध्य सोबत एकीकडे दिसली होती. तर दुसरीकडे संपूर्ण बच्चन कुटुंब होतं. अभिषेक सोबत विवाह होण्याआथी ऐश्वार्या रायचं नाव अनेक बॉलिवूड स्टार सोबत जोडण्यात आलं.
आता अभिषेक बच्चनसोबत तिचा घटस्फोटाच्या बातम्यांमुळे ती गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पण याआधी ऐश्वर्या राय तिच्या अफेअर्समुळे खूप चर्चेत असायची. अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या रायच्या आयुष्यात अनेक लोक आले आणि गेले. या यादीत सलमान खानपासून विवेक ओबेरॉयपर्यंत या नावांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहित आहे का की विवेक ओबेरॉयचे ऐश्वर्या रायवर खूप प्रेम होते. तो तिच्यासाठी पूर्णपणे वेडा झाला होता असं ही बोललं जातं.
फार कमी लोकांना माहित आहे की विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायला तिच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त 30 भेटवस्तू दिल्या होत्या. या भेटवस्तूंशिवाय त्याने ऐश्वर्या रायला पाळीव कुत्राही भेट म्हणून दिला होता. ज्याचे सनशाईन असे नाव ठेवण्यात आले होते. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्याचे हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांचं ब्रेकअप झालं.
विवेक ओबेरॉय याने एक पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये सलमान खान आपल्याला त्रास देत असल्याचं त्याने म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेनंतरच विवेक ओबेरॉय आणि ऐश्वार्याचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं. कारण ऐश्वर्या रायला विवेक ओबेरॉयची ही कृती खूपच बालिश वाटली होती. ज्यामुळे तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याआधी ऐश्वर्या राय सलमान खानला डेट करत होती.