
Dhurandhar Rahman Dakait: : सध्या सगळीकडे धुरंधर या हिंदी चित्रपटाची चर्चा आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील संवाद, गाणी आणि काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्सऑफिसवरही चांगलीच कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह याची मुख्य भूमिका असली तरीही चर्चा मात्र वेगळ्याच अभिनेत्याची होत आहे. या चित्रपटात रहमान डकैत हे पात्र साकारणारा अक्षय खन्ना सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने या चित्रपटात केलेल्या कामाचे सगळीकडे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे चित्रपटात नकारात्मक भूमिका असूनही सगळीकडे त्याचीच वाहवा होत आहे. दरम्यान, धुरंधरमध्ये अक्षय खन्नाने नकारात्मक भूमिका साकारलेली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याची जीवनशैली फारच वेगळी आहे. त्याची संपत्ती कोट्यवधी रुपयांत आहे.
अक्षय खन्नाचे प्रत्यक्षात फारच वेगळ्या पद्धतीने राहतो. आजकाल सगळीकडे सोशल मीडियाचा प्रभाव दिसतो. अक्षय खन्ना मात्र सोशल मीडियावर कुठेच नाही. तो एखाद्या चित्रपटात आपली भूमिका करतो आणि पुन्हा गायब होतो. त्याच्या कामाची मात्र पुढे कित्येक दिवस चर्चा होते. अक्षय खन्नाचा काही दिवसांपूर्वी छावा हा चित्रपट आला होता. या चित्रपटात त्याने औरंगजेबाची भूमिका केली होती. त्याच्या या कामाचीही तेवढीच प्रशंसा झाली होती. अक्षय खन्ना दिवंगत अभिनेते वनोद खन्ना यांचा मुलगा आहे. परंतु त्याने बॉलिवुडमध्ये एक वेगळे स्थान मिळवलेले आहे.
अक्षय खन्नाची आज सगळीकडेच चर्चा आहे. तो लाईमलाईटपासून नेहमीच दूर असतो. असे असले तरी त्याच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. मुंबईत जुहू येते समुद्रकिनारी त्याचा एक आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत साधारण 35 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या घरात एक प्रायव्हेट थिएटर, महागडे आर्टवर्क असल्याचे सांगितले जाते.
त्यानंतर अक्षय खन्नानाचा एक मलबार हिल या भागातही एक बंगला आहे. हा परिसर मुंबईतील प्रतिष्ठित भागापैकी एक मानला जातो. या बंगल्याची किंमत साधारण 60 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय अलिबागमध्ये त्याचे एक फार्महाऊस आहे. मुंबईतील ताडदेव या भागात त्याचे एक अपार्टमेंटही आहे. त्याच्याकडे मर्सिडज बेंझ, बीएमडब्ल्यू, फॉच्यूनर यासारख्या महागड्या गाड्या आहेत. त्याच्याकडे एकूण 167 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते.