युजवेंद्र – धनश्री यांचा घटस्फोट, कोर्टात सांगितलं कारण, ‘गेल्या 18 महिन्यांपासून आम्ही…’

Yuzvendra Chahal -Dhanshree Verma divorce: 'आज पासून दोघे पती - पत्नी नाहीत...', लग्नाच्या 4 वर्षांनंतर युजवेंद्र - धनश्री यांचा घटस्फोट, कोर्टात सांगितलं विभक्त होण्याचं कारण, घटस्फोटानंतर चर्चांना उधाण...

युजवेंद्र - धनश्री यांचा घटस्फोट, कोर्टात सांगितलं कारण, गेल्या 18 महिन्यांपासून आम्ही...
| Updated on: Feb 21, 2025 | 11:09 AM

Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced: भारतीय क्रिकेट टीमचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टात दोघांना घटस्फोटाची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे. यजुवेंद्र आणि चहल यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांचं देखील मोठा धक्का बसला आहे. वकिलाने एका वृत्तवाहिनीला दलेल्या माहितीनुसार, घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीसाठी आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दोघेही गुरुवारी सकाळी 11.00 वाजल्यापासून कौटुंबिक न्यायालयात हजर होते. न्यायाधीशांनी दोघांनाही काउन्सलरकडे पाठवलं होतं. घटस्फोट घोषित करण्यापूर्वी हे सेशन तब्बल 45 मिनिटं सुरु होतं.

वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात धनश्री आणि युजवेंद्र म्हणाले की, आम्ही परस्पर सहमतीने घटस्फोट घेत आहोत. अन्य प्रश्नांचं उत्तर देतनाना दोघे म्हणाले, गेल्या 18 महिन्यांपासून दोघे वेगळे राहत आहेत. सांगायचं झालं तर, परस्पर संमतीने घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये, जोडप्याला कमीतकमी एक वर्ष एकमेकांपासून दूर राहावे लागते, जे अशा प्रकरणांमध्ये घटस्फोटाचा आधार बनते.

 

 

घटस्फोटाचं कारण काय?

यावेळी धनश्री आणि युजवेंद्र यांनी वेगळं होण्याचं कारण देखील सांगितलं. कम्पॅटिबिलिटी संबंधी मुद्द्यांवरुन दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यायाधीशांनी आपला निर्णय देताना सांगितले की, आजपासून दोघेही पती-पत्नी नसतील…, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीशांनी दुपारी 4.30 वाजता हा निर्णय दिला. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीशांनी गुरुवारी दुपारी 4.30 वाजता घटस्फोट झाल्याचा निर्णय दिल्याची देखील माहिती समोर येत आहे.

सांगायचं झालं तर, एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून सतत दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात वाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. पण ही निव्वळ चर्चाच असावी असंच चाहत्यांना वाटत होतं. कारण यावर दोघं कधीच व्यक्त झाले नाहीत.

पण या वर्षाच्या सुरुवातील दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं होतं. अनफॉलो केल्यानंतर चहल आणि धनश्रीने आपल्या नात्याबाबत काहीच स्पष्ट केलं नाही. अद्यापही घटस्फोटावर दोघांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.