
सुपरस्टार रजनीकांत याचा दबदबा अजूनही कायम आहे. आता रजनीकांत यांचे वय ७४ वर्षांचे आहे. तरी त्यांच्या अभिनयावर आणि स्टाईलवर प्रेक्षकांचे प्रेम आटलेले नाही उलट वाढलेलेच आहे. ज्यामुळे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली ते म्हणजे त्यांची डायलॉग डिलिव्हरी आणि डॅशिंग एण्ट्री आणि स्टाईल आजही कायम आहे. पंच्याहत्तरी गाठणाऱ्या ‘थलाइवा’ रजनीकांत या वयातही लीड रोल करीत आहेत.
रजनीकांत यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक बिगबजेट आणि ब्लॉकब्लास्टर चित्रपटात काम केले आहे. साल १९७५ मध्ये ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटात एका छोट्याशा रोलने त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर रजनीकांत यांनी साऊथ ते बॉलीवूड खूप नाव कमावले. अभिनय करण्याआधी त्यांनी कधी कुलीची तर कधी बस कंडक्टरची नोकरी केली होती. आज ते कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. परंतू त्यांचा पहिला पगार एक हजार रुपयांहून कमी होती.
रजनीकांत यांचा जन्म कर्नाटकातील बंगळुरु येथे १२ डिसेंबर १९५० रोजी एका मराठी कुटुंबात झाला होता. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड होते. अभिनेता होण्यापूर्वी ते कंडक्टर म्हणून काम करत होते. तेथे त्यांना महिन्याला ७५० रुपये पगार होता. या हिशेबाने त्यांचा पहिला पगार ७५० रुपये होता.
कधी महिन्यास ७५० रुपये कमावणाऱ्या रजनीकांत यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाल्यानंतर त्यांचे जीवन संपूर्णपणे बदलले. आपल्या ५० वर्षांच्या अभिनयाच्या करियरमध्ये ते त्यांच्या कुटुंबासह चेन्नईतील उच्चभ्रू वस्तीत पॉईस गार्डन येथे राहातात. त्यांच्या घराची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये आहे.
रजनीकांत यांच्या सध्याच्या प्रोजेक्टचा विचार करताना त्यांचा आगामी ‘कुली’नावाचा चित्रपट चर्चेत आहे. ३५० कोटी बजेटचा हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.याचा सामना बॉक्स ऑफीसवर ऋतिक रोशन आणि जूनियर एनटीआरच्या ४०० कोटींचा चित्रपट ‘वॉर 2’ शी होणार आहे.