
Priyanka Chopra And Nick Jonas : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या खूप चर्चेत आहे. नुकतीच तिने मेट गाला 2023 (Met Gala 2023) या फॅशन इव्हेंटला हजेरी लावली. त्यावेळी प्रियांकाचा पती आणि गायक निक जोनासही (Nick Jonas) उपस्थित होता. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची क्यूट बाँडिंग चाहत्यांना खूप आवडते. दोघांचे सार्वजनिक स्वरूपही खूप जास्त आहे. त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे, मेट गाला 2023 च्या एका इव्हेंटनंतर प्रियांका व निक नेहमीप्रमाणे दोघेही एकमेकांचा हात धरून पुढे जात होते. यादरम्यान प्रियांका चालताना अडखळली, तिचा तोलही गेला. मात्र तिथे उपस्थित निक जोनासने तिला नीट आधार देत सावरले आणि अभिनेत्रीचा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही.
मेट गालाचा इव्हेंट आता संपला आहे. या मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये जगभरातील स्टार्स दिसले ज्यांनी त्यांच्या फॅशनेबल आणि ग्लॅमरस आउटफिट्सने चाहत्यांची मने जिंकली. यामध्ये इंटरनॅशनल स्टार बनलेल्या प्रियांका चोप्राच्या नावाचाही समावेश होता. रेड कार्पेटवर अभिनेत्री रेड आउटफिटमध्ये दिसली. तिची शैली पूर्णपणे वेगळी वाटत होती. उंच टाचांच्या चपला घालून चालत असलेल्या प्रियांकाने पॅप्स आणि मीडियाला संबोधित केले आणि कार्यक्रमादरम्यान पती निक जोनाससोबत दिसली.
निकमुळे वाचली प्रियांका
पण यादरम्यान अभिनेत्रीचा तोल गेला आणि ती पडणारच होती तेव्हा निक जोनासने तिला पकडले आणि सावरले. निक आधीच अभिनेत्रीचा हात पकडून चालत होता. निकमुळे प्रियंकाही ताबडतोब सावरली आणि नेहमीप्रमाणेच चालू लागली. निक जोनास आणि प्रियांकाचा हा क्यूट व्हिडिओ पाहून चाहतेही कौतुक करणे थांबवू शकले नाहीत.
एका युजरने लिहिले- ‘एखाद्याचा हात पकडणे ही जगातील सर्वात सुंदर भावनांपैकी एक आहे.’ दुसर्या व्यक्तीने लिहिले- ‘ बरं झालं, प्रियांका वाचली.’ याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले- ‘परिस्थिती काहीही असो, निक जोनास नेहमी प्रियांकाच्या पाठीशी आहे. ते पाहणं सुंदर आहे.’ अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यानी दोघांचेही कौतुक केले आहे.
प्रियांका रोमॅंटिक फिल्ममध्ये झळकणार
कामाबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांका चोप्राची वेब सीरिज सिटाडेल नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. या वेब सिरीजचे दोन भाग रिलीज झाले असून आता पुढील तयारी सुरू आहे. सिटाडेल व्यतिरिक्त, अभिनेत्री सध्या तिच्या आगामी ‘लव्ह अगेन’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या रोमँटिक चित्रपटाचा प्रीमियरही नुकताच झाला. बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे.