Salman Khan | … जेव्हा सलमान खानने खासदाराचं जगणं केलं होतं कठीण, व्हिडीओ पाहून म्हणाल…

Salman Khan | अभिनेता आणि खासदारामध्ये नक्की झालं तरी काय होतं? भाईजानने केलं होतं खासदाराचं जगणं कठीण... व्हिडीओ तुफान व्हायरल... सलमान खान याचे फक्त इंडस्ट्रीमध्येच नाहीतर, राजकारणी व्यक्तींसोबत देखील ओळखी आहेत... सर्वत्र अभिनेत्याची चर्चा....

Salman Khan | ... जेव्हा सलमान खानने खासदाराचं जगणं केलं होतं कठीण, व्हिडीओ पाहून म्हणाल...
सलमान खान
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 9:09 AM

अभिनेता सलमान खान याला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सलमान खान फक्त त्याच्या सिनेमांमुळे नाही तर, इतर अनेक कारणांमुळे देखील चर्चेत असतो. आता देखील सलमान खान एका जुन्हा व्हिडीओमुळे चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, व्हायरल होत असलेला व्हिडीओ सलमान खान याच्या खऱ्या आयुष्यातील नाहीतर, एका सिनेमातील आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान खासदार आणि अभिनेते रवी किशन यांना धमकावताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर ज्या सिनेमाचा सीन व्हायरल होत आहे. तो सिनेमा दुसरा तिसरा कोणता नाहीतर, ‘तेरे नाम’ आहे. ‘तेरे नाम’ सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेते रवी किशन आणि अभिनेत्री भुमिका चावला यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमा आजही चाहते विसरु शकलेले नाहीत.

‘तेरे नाम’ सिनेमातील एक सीन तुफान व्हायरल होत आहे. सीनमध्ये भाईजान रवी किशन यांना धमकावताना दिसत आहे. सिनेमात दाखवल्याप्रमाणे सलमान याचं भुमिका हिच्यावर जीवापाड प्रेम होतं. आपलं प्रेम मिळवण्यासाठी सलमान खान करत असलेले प्रयत्न… याभोवती सिनेमाची कथा फिरताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये रवी किशन यांना भुमिका हिच्यासोबत पाहिल्यानंतर सलमान संतापतो आणि पुन्हा तिच्यासोबत दिसायचं नाही… अशी धमकी रवी किशन यांनी देताना दिसत आहे. सिनेमात रवी किशन यांनी भुमिका हिच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे. सिनेमात रवी किशन यांना सभ्य आणि संस्कारी भूमिकेत दाखवण्यात आलं होतं. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमामुळे सलमान खान, रवी किशन आणि भुमिका चावला यांच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली होती.

सांगायचं झालं तर, सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील सिनेमाची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कमी झालेली नाही. सिनेमातील काही सीन आणि गाणी आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सिनेमा प्रदर्शित झाल्यानतंर सलमान खान याच्या लूकची देखील सर्वत्र चर्चा रंगली होती.

खासदार रवी किशन

खासदार रवी किशन फक्त उत्तम नेता नाहीतर, अभिनेते देखील आहे. भोजपुरी, बॉलिवूड, दाक्षिणात्य सिनेमांमध्ये देखील रवी किशन यांचा बोलबाला आहे. आपल्या अभिनयातून चाहत्यांचं मनोरंजन करणारे रवी किशन दोनवेळा खासदार म्हणून निवडूण आले आहेत. यावेळी पुन्हा रवी किशन यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावलं आणि यश मिळवलं.

Non Stop LIVE Update
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात....
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात.....
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?.
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र.
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले.