AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियांकाने ऐनवेळी ‘भारत’ चित्रपटात काम करण्यास दिला होता नकार; चिडलेला सलमान म्हणाला “माझ्यासोबत काम..”

प्रियांकाने नकार दिल्यानंतर कतरिनाने सलमानला एका झटक्यात होकार दिला. त्यावेळी कतरिनाच्या हाती इतरही प्रोजेक्ट्स होते. मात्र सलमानसाठी ती काम करण्यास तयार झाली होती.

प्रियांकाने ऐनवेळी 'भारत' चित्रपटात काम करण्यास दिला होता नकार; चिडलेला सलमान म्हणाला माझ्यासोबत काम..
Salman Khan and Priyanka ChopraImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 08, 2023 | 11:35 AM
Share

मुंबई : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने भारतासोबतच परदेशातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतींमध्ये प्रियांकाने बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत काही धक्कादायक खुलासे केले होते. इंडस्ट्रीने तिला एका कोपऱ्यात ढकलून दिलं होतं, म्हणून तिने हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असं प्रियांकाने सांगितलं. मात्र फार क्वचित लोकांना हे माहीत असेल की प्रियांकाने सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटाला ऐनवेळी नकार दिला होता. त्यामुळे अखेरच्या क्षणी तिच्या जागी कतरिना कैफची निवड करण्यात आली. यावर प्रियांका कधीच व्यक्त झाली नव्हती. मात्र ‘लव्हरात्री’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सलमान खान याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता.

सलमान म्हणाला, “आम्ही तिच्यासाठी फार खुश आहोत. जर त्यावेळी आम्हाला हे समजलं असतं की तिने तिथे मोठा चित्रपट साइन केला आहे आणि हे थोडं आधी आम्हाला कळालं असतं तर आम्ही तसंही तिला थांबवलं नसतं. 10 दिवस आधी आम्हाला समजलं. माझी शूटिंग सुरू झाली होती. पण तिच्या शेड्युलच्या 10 दिवस आधी तिने सांगितलं की तिला चित्रपट सोडायचा आहे. ती माझ्या घरी आली होती. मी तिला म्हणालो, तुला जर हा चित्रपट करायचा नसेल तर नको करूस. पण त्यावेळी तिने आम्हाला वेगळी कारणं दिली होती.”

“पण लग्नाचं कारण असो, चित्रपटाचं कारण असो, तिचं भारतात काम न करण्याचं कारण असो, माझ्यासोबत काम न करण्याचं कारण असो किंवा हॉलिवूडमध्ये चित्रपट किंवा टीव्ही शोज करण्याचं कारण असो, जे काही असेल ती तिची कारणं आहेत. तिच्या कामासाठी आम्ही खुश आहोत आणि आमचा तिला पाठिंबा आहे. परदेशात ती आपल्या देशाचं नावलौकीक करतेय”, असं तो पुढे म्हणाला. प्रियांकाने नकार दिल्यानंतर कतरिनाने सलमानला एका झटक्यात होकार दिला. त्यावेळी कतरिनाच्या हाती इतरही प्रोजेक्ट्स होते. मात्र सलमानसाठी ती काम करण्यास तयार झाली होती.

प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीपासून लांब जाण्यामागचं कारण सांगितलं होतं. यावेळी तिने बॉलिवूडबाबत काही धक्कादायक खुलासेसुद्धा केले होते. इंडस्ट्रीतील लोकांनी मला एका कोपऱ्यात ढकललं होतं, टिकून राहण्यासाठी मला लोकांसोबत बीफ खावं लागलं होतं, अशी तक्रार तिने बोलून दाखवली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या राजकारणाला वैतागून हॉलिवूडला गेल्याचं तिने स्पष्ट केलं होतं.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा