AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CID मधून प्रसिद्धीच्या झोतात सेलिब्रिटी आता कुठे? एकाचं निधन, तर ही अभिनेत्री कमावते कोट्यवधींची माया

CID मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले ते कलाकार आता कुठे आहेत? असा प्रश्न तुम्हला देखील पडला असेल. तर सीआयडी शोमधील एकाचं निधन झाले आहे, तर एक अभिनेत्री व्यावसायिक बनली आहे. तर जाणून घ्या अन्य सेलिब्रिटी काय करतात.

CID मधून प्रसिद्धीच्या झोतात सेलिब्रिटी आता कुठे? एकाचं निधन, तर ही अभिनेत्री कमावते कोट्यवधींची माया
| Updated on: Sep 12, 2026 | 2:52 PM
Share

1998 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने तब्बल दोन दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 2018 मध्ये हा शो बंद झाला आणि त्यानंतर चाहत्यांनी सातत्याने ‘सीआयडी’ परत आणण्याची मागणी केली. अखेर 2024 मध्ये या मालिकेनं पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. पण शो कमी कालावधीतच बंद झाला. पण शोमधील सेलिब्रिटी आजही चर्चेत असतात. पण काही सेलिब्रिटी कुठे आहेत, आणि काय करतात याबद्दल फार कोणाला माहिती नसेल… तर सीआयडी शोमधील एकाचं निधन झाले आहे, तर एक अभिनेत्री व्यावसायिक बनली आहे. तर जाणून घ्या अन्य सेलिब्रिटी काय करतात.

‘सीआयडी’ (CID) मधील एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारून शिवाजी साटम घराघरात पोहोचले. आजही लोक त्यांना एसीपी प्रद्युम्न म्हणूनच ओळखतात. हा शो संपल्यानंतरही त्यांनी सिनेमा, वेब सिरीज आणि जाहिरातींमध्ये काम करणे सुरूच ठेवलं आहे. अनेक सिनेमांमध्ये देखील दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.

‘सीआयडी’ मधील इन्स्पेक्टर दया हे दुसरे सर्वात लोकप्रिय पात्र आहे. अभिनेते दयानंद चंद्रशेखर शेट्टी यांनी या भूमिकेला जिवंत केलं आणि त्यातून प्रचंड लोकप्रियता मिळवली. ‘सीआयडी’ नंतर ते इतर अनेक शोमध्ये झळकले. त्यांनी ‘सिंघम अगेन’ या सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारली आणि ‘सिंगल पापा’ या वेब सिरीजमध्येही काम केले. प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतलं.

अभिनेता आदित्य श्रीवास्तव याने ‘सीआयडी’ मध्ये इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं होतं. आदित्यआता सिनेमांमध्ये कार्यरत असून, ‘हसीन दिलरुबा’, ‘आयसी 814: द कंधार हायजॅक’ आणि ‘सुपर 30’ यांसारख्या सिनेमांमध्ये झळकला आहे.

अभिनेते नरेंद्र गुप्ता यांनी ‘सीआयडी’मध्ये डॉ. साळुंखे यांची भूमिका साकारली आणि आपल्या विनोदी अभिनयाने आणि आपल्या कॉमिक टाइमिंने प्रेक्षकांची मने जिंकली. हा शो संपल्यानंतर त्यांनी विविध सिनेमात आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. आजही त्यांच्या भूमिकांचं कौतुक होतं.

CID मध्ये डॉ. तारिकाची भूमिका साकारणारी श्रद्धा मुसाळे सध्या अभिनयापासून दूर आहे. तिने अभिनय सोडून उद्योजिका बनण्याचा निर्णय घेतला असून, Future Taiyari या ed-tech स्टार्टअपची ती संस्थापक आहे. श्रद्ध सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

‘सीआयडी’मधील इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स म्हणजे फ्रेडी या अविस्मरणीय भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झालं आहे. 2023 मध्ये ‘मल्टिपल ऑर्गन फेल्युअर’मुळे त्यांचं निधन झाले.

Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार