AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

falguni Pathak यांना एक हट्ट पडला महागात, सर्वकाही झालं उद्ध्वस्त? मोठं सत्य समोर

Garba Queen falguni Pathak : फाल्गुनी पाठक आहेत तरी कुठे? एका हट्टामुळे झालं सर्वकाही उद्ध्वस्त, त्यांच्याबद्दल अखेर मोठं सत्य समोर आलंच... आज देखील गरबा खेळण्यासाठी असंख्य गाणी आहेत, पण फाल्गुनी पाठक यांची गाणी प्रसिद्ध

falguni Pathak यांना एक हट्ट पडला महागात, सर्वकाही झालं उद्ध्वस्त? मोठं सत्य समोर
| Updated on: Oct 14, 2023 | 3:30 PM
Share

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : नवरात्रीमध्ये चाहते एक व्यक्ती सतत आठवण काढणार आणि ती व्यक्ती म्हणजे ‘गरबा क्विन’ फाल्गुनी पाठक. ‘मैंने पायल है खनकाये’, ‘चुडी’, ‘मेरी चुनर उड उड जाये’, ‘ये किसने जादू किया’ यांसारख्या गाण्यांमुळे ९० च्या दशकातील दिवस आजही अनेकांना अठवतात. आज देखील गरबा खेळण्यासाठी असंख्य गाणी आहेत, पण फाल्गुनी पाठक यांच्या गाण्यांमध्ये असलेलं प्रेम कुठेही मिळणार नाही. ९० च्या दशकाला एक वेगळं वळण देणाऱ्या गरबा क्विन फाल्गुनी पाठक आज कुठे आहेत, काय करतात? याबद्दल फार कोणाला माहिती नाही. फक्त भारतात नाही तर परदेशात देखील फाल्गुनी पाठक यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

आजही नवरात्र त्यांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होवू शकत नाही. कायम एखाद्या मुलासारख्या राहण्या फाल्गुनी पाठक एक मुलगी आहेत, हे तेव्हा फारसं कोणाला माहिती नव्हतं.. पण गाण्यांमुळे आणि मधूर आवाजामुळे फल्गुनी पाठक यांची लोकप्रियता वाढत गेली आणि गरबा क्लिनबद्दल अधिक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असायचे.

एक काळ होता जेव्हा सिनेमांच्या गाण्यांपेक्षा फाल्गुनी पाठक यांचे अल्बम तुफान लोकप्रिय व्हायचे. ज्यामुळे बॉलिवूडमधून त्यांना अनेक संधी देखील आल्या. पण त्यांनी बॉलिवूडमध्ये न गाण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडमधून चांगल्या ऑफर फाल्गुनी पाठक यांनी का फेटाळल्या? असा प्रश्न तुम्हाला देखील नक्कीच पडला असेल.

या प्रश्नाचं उत्तर खुद्द फाल्गुनी पाठक यांनी एका मुलाखतीत दिलं होतं. त्या एका उत्तरामुळे देखील फाल्गुनी पाठक तुफान चर्चेत आल्या. फाल्गुनी पाठक एका हट्टामुळे बॉलिवूडपासून दूर राहिल्या. बॉलिवूडमध्ये कधीही काम न करण्याचा निर्णय फाल्गुनी पाठक यांनी घेतला होता.

बॉलिवूडमध्ये काम न करण्याचा निर्णय सांगत फाल्गुनी पाठक म्हणाल्या, ‘मी बॉलिवूडकडे कधीच गांभीर्याने पाहिलं नाही. पण तुम्ही जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करता, तेव्हा तुम्हाला अधिक मेहत घ्यावी लागते. मी माझे शो आणि अल्बम करुन आनंदी आणि समाधानी होती..’ असं देखील फाल्गुनी पाठक म्हणाल्या होत्या.

मुलासारख्या का राहतात फाल्गुनी पाठक?

फाल्गुनी पाठक यांच्या जन्मापूर्वी त्यांचा चार बहिणी होत्या. त्यामुळे आई वडिलांना आणि चार बहिणींना एक भाऊ हवा होता. अशात फाल्गुनी पाठक यांचा जन्म झाला. पण गरबा क्विन यांच्या चार बहिणींनी सर्वात लहान बहिणीला भाऊ मानलं. फाल्गुनी पाठक यांच्या बहिणींनी कायम लहान बहिणीला मुलासारखं ठेवलं. कपडे देखील मुलासारखेच दिले.

फाल्गुनी पाठक यांचे केस वाढले, तरी ते लगेच कापले जायचे. लहानपणापासून सुरु झालेली सवय यशाच्या शिखरावर चढताना ओळख झाली. रविवारपासून नवरात्री सुरु होणार असल्यामुळे सर्वत्र फाल्गुनी पाठक यांची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी गरब्यासाठी फाल्गुनी पाठक यांची गाणी देखील वाजतील.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान