Kantara: पाण्याच्या बाटल्या विकल्या, हॉटेलमध्ये केलं काम; ‘कांतारा’च्या ऋषभचा संघर्ष

| Updated on: Nov 01, 2022 | 1:25 PM

18 वर्षांच्या संघर्षानंतर 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी बनला स्टार

Kantara: पाण्याच्या बाटल्या विकल्या, हॉटेलमध्ये केलं काम; कांताराच्या ऋषभचा संघर्ष
Kantara
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- ‘कांतारा’ या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्याची सध्या जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा कन्नड चित्रपट ठरला आहे. मोजक्या स्क्रीन्सवर प्रदर्शित होऊनसुद्धा ‘कांतारा’ने जादू केली आहे. या चित्रपटाची आतापर्यंत 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई झाली आहे. ऋषभ शेट्टीनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तिहेरी भूमिकेत असलेल्या ऋषभबद्दल चाहत्यांमध्ये फार उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोण आहे ऋषभ शेट्टी?

‘कांतारा’च्या यशामुळे ऋषभ आता पॅन-इंडिया स्टार बनला आहे. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. ऋषभ आज साऊथ सिनेमाचा स्टार जरी बनला असला तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने बराच संघर्ष केला आहे. या यशापर्यंत पोहोचण्यासाठी ऋषभने जवळपास 18 वर्षे संघर्ष केला.

हे सुद्धा वाचा

कॉलेजचं शिक्षण पूर्ण होताच ऋषभने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. थिएटरपासून त्याने करिअरची सुरुवाची केली. त्यानंतर त्याने काही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

कॉलेजमध्ये शिकत असताना ऋषभ अभ्यासासोबतच छोटी-मोठी कामंसुद्धा करायचा. एकेकाळी त्याने पिण्याच्या पाण्याचे बॉटल्ससुद्धा विकले आहेत आणि हॉटेलमध्येही काम केलं आहे. प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीनुसार, ऋषभला त्याच्या अथक परिश्रमाचं फळ ‘कांतारा’च्या प्रदर्शनानंतर मिळालं.

2004 मध्ये ऋषभने ‘नाम अरियल उंदिना’ या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटात त्याची काही खास भूमिका नव्हती. मात्र त्याने अत्यंत प्रामाणिकपणे ती भूमिका साकारली. त्यानंतर त्याने इतरही काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. ऋषभने काही काळ सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलंय. बऱ्याच स्ट्रगलनंतर 2019 मध्ये ऋषभने पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली होती.

‘कांतारा’ या चित्रपटासाठी ऋषभचं प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. 14 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘कांतारा’ला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.