AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: म्हणून आम्ही दुरावलो..; नाना पाटेकरांनी सांगितलं होतं पत्नीपासून वेगळं राहण्याचं कारण

नान पाटेकर वयाच्या 75 व्या वर्षी गोवा येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे करिअर घडण्यामागे त्यांच्या बायकोचा मोठा हात होता. नाना पाटेकरांची बायको देखील एक अभिनेत्री आहे. ती सध्या काय करते. जाणून घ्या सविस्तर

Nana Patekar: म्हणून आम्ही दुरावलो..; नाना पाटेकरांनी सांगितलं होतं पत्नीपासून वेगळं राहण्याचं कारण
nana patekar wifeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 4:37 PM
Share

मराठी सिनेमाचे नटसम्राट विश्वनाथ पाटेकर म्हणजेच आपले लाडके नाना पाटेकर यांना आज वयाच्या 75 व्या वर्षी देवाज्ञा झाली. गोव्यात डोना पावला येथील बंगल्यात त्यांना रात्री कार्डिएक अरेस्ट आला आणि सकाळी 5.30 च्या सुमारास त्यांचे देहावसान झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना तब्बल 45 मिनिटे CPR देण्यात आला पण त्याच्या काहीच फायदा झाला नाही. नानाच्या मृत्यूची हा बातमी कळताच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. तर प्रेक्षकांना त्यांच्या जाण्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. असा नट होणे नाही असे वाक्य प्रत्येकाच्या अंत करणातून उमटत आहेत.

नाना असे प्रसिद्ध नट होण्यामागे सिनेसृष्टीत नाव ओळख मिळवण्यामागे त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा आहे. असे खुद्द नानांनी एका मुलाखतीत म्हटले होते. ती ठामपणे पाठीशी उभी होती. तिचे आभार मानावे तितके कमीच आहेत असे सु्द्धा नानांनी म्हटले होते. नानांच्या पश्चात त्यांची पत्नी निलकांती पाटेकर आणि त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर आहेत. नानांची पत्नी निलाकांती याही सध्या हिंदी सिनेमात काम करत आहेत.

नाना आणि निलकांती यांची पहिली भेट कुठे झाली?

नाना आणि त्यांची पत्नी निलकांती यांची पहिली भेट मराठी नाटकाच्या रंगमंचावर झाली. त्यावेळी निलकांती बँकेत अधिकारी म्हणून नोकरी करत होत्या त्याचसोबत आपली अभिनयाची आवडही जोपासत होत्या. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. 1978 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. काही वर्षानी निलकांती यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. परंतु शारिरीक अक्षमतेमुळे त्यांचा पहिल्या मुलाचा दुर्वासा पाटेकर याचा अडीच वर्षाचा असताना निधन झाले. त्यानंतर मल्हार पाटेकर याचा जन्म झाला.

निलकांती यांचा प्रवास कसा होता

निलांकांती यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील केंद्रिय उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असल्यामुळे अनेक वेळा त्यांना घर बदलत राहावे लागले. त्यांनी फिजिक्समध्ये आपलं शिक्षणं पुर्ण केलं त्यानंतर वडिलांच्या इच्छेसाठी IIT ची प्रवेश परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही झाल्या. परंतु त्यांच मन इंजिनिअरिंगमध्ये लागलं नाही. त्यामुळे त्यांनी आवड जोपासायचे ठरवले आणि रंगभूमीची वाट धरली.

1973 साली महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

निलकांती यांनी मराठी रंगभूमीवर कां करण्यात सुरूवात केली. अभिनयातील त्यांच्या कामाची दखलही घेतली गेली. 1973 मध्ये त्यांना महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सुवर्णपदकही मिळालं. 1989 मध्ये सचिन पिळगावकर यांच्यासोबत आत्मविश्वास या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. या अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.

नाना पाटेकर आणि निलकांती यांनी डिवोर्स न घेता लांब राहण पसंत केलं

लग्नाच्या एका टप्प्यानंतर नाना आणि निलकांती पाटेकर वेगवेगळे राहू लागले. मात्र त्यांचा घटस्पोट झाला नव्हता. नानांनी याआधीही त्यांच्या नात्याबद्दल बोलताना अनेक वर्षे सुख : दुखात साथ दिल्याचं सांगितलं. आमच्यात मतभेद झाले, म्हणून आम्ही 35 वर्ष एकमेकांपासून दूर राहिलो, असंही नाना पाटेकर यांनी सांगितलेलं.

छावा या सिनेमातून निलकांती यांनी केले कमबॅक

निलंकाती काही काळ अभिनयापासून दूर होत्या. पण छावा या सिनेमातून त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केले. विकि कौशल आणि रश्मिका मंदाना हिच्या छावा या सिनेमात त्यांनी धाराऊची भूमिका साकारली. नानांची पत्नी म्हणून त्यांना ओळख आहेच तर आपल्या अभिनयाने देखील त्यांच नाव चर्चेत आहे.

Follow Us
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...