
Viral Video : प्रत्येक तासाला सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होत असते. ज्यामध्ये काही गोष्टी या भावनिक असतात. तर काही गोष्टी या प्रेक्षकांच्या मनोरंजन करणाऱ्या असतात. अशातच आता सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओमुळे 26 वर्षीय अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली आहे. हा व्हिडीओ X (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो Indian Youth Premier League च्या 25व्या वर्धापनदिन सोहळ्यातील आहे.
या कार्यक्रमात ओडिशातील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी संगीताला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान सिवानी मंचावर बोलण्यासाठी आली असताना प्रेक्षकांमधील एका चाहत्याने केलेल्या खास कमेंटमुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.
चाहत्याच्या त्या वाक्याने अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर फुललं स्मितहास्य
मंचावर येताच सिवानी म्हणाली की, मी दोन मिनिटांत एक गाणं ऐकवते. याच वेळी समोर उभा असलेला एक चाहता म्हणाला, 10 मिनिटं घ्या, पण गाणं नक्की गा’. हे ऐकताच सिवानी हसली आणि म्हणाली हो बाबा… ओके.
यानंतर तोच चाहता पुढे म्हणाला, ‘आम्हाला ओडिया भाषा समजत नाही. आम्ही उत्तर प्रदेशमधून आलो आहोत. तरीसुद्धा तुम्ही गा, छान वाटेल.’ हा संवाद ऐकून सिवानीच्या चेहऱ्यावरची आपुलकी आणि साधेपणा पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. त्याने दिलेलं उत्तर आणि तिचा स्वभाव सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.
Odisha की मशहूर अभिनेत्री और गायिका शिवानी संगीता को Indian Youth Premier League की 25वीं वर्षगांठ पर Chief Guest के तौर पर बुलाया गया था।
जब शिवानी मंच पर आईं और बोलीं कि
“मैं 2 मिनट में एक गाना सुनाती हूं”तभी नीचे से एक लड़के की आवाज़ आई
“10 मिनट ले लीजिए, लेकिन गाइए… pic.twitter.com/S5T5m5Ce4p— Mock_ (@MockInc2025) January 9, 2026
कोण आहेत शिवानी संगीता?
व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेली शिवानी संगीता ही ओडिया फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तिचा जन्म 12 जुलै 2000 रोजी कटक, ओडिशा येथे झाला. अवघ्या सहा वर्षांच्या वयापासून तिने मनोरंजन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
शिवानी ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असून तिचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचे देखील लाखो चाहते आहेत. तिच्या फोटोंनी देखील चाहत्यांना वेड लावलं आहे.
व्हायरल व्हिडीओमुळे वाढली लोकप्रियता
Indian Youth Premier League च्या कार्यक्रमातील तिच्या यान साध्या आणि मन जिंकणारा प्रसंग सध्या शिवानी संगीताला देशभरात ओळख मिळवून देत आहे. तिचा साधेपणा पाहून प्रत्येकजण सोशल मीडियावर ही व्हायरल गर्ल कोण? असा प्रश्न विचारताना दिसतो आहे.