
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने चाहत्यांना गोड बातमी दिली असून नुकताच तिचा साखरपुडा झाला. विशेष म्हणजे या साखरपुड्याची अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे येत आहेत. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर याच्यासोबत साखरपुडा केला. तेजस्विनी लोणारी हिची फॅन फॉलोइंग जबरदस्त बघायला मिळते. अभिनेत्रीच्या साखरपुड्याबद्दल कळाताच चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दल कधी प्रश्न केल्या तर ती भाष्य करणे टाळताना अनेकदा दिसली. आता थेट राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यासोबतच तिने लग्न केले. सरवणकर कुटुंबियांची सून तेजस्विनी लोणारी होणार आहे.
कोण आहेत समाधान सरवणकर जाणून घ्या
वडील सदा सरवणकर यांच्या प्रमाणेच समाधान सरवणकर राजकारणात सक्रिय आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर राहिले आहेत. सदा सरवणकर माहिम विधानसभा मतदारसंघाकडून शिवसेनेचे माजी आमदार आहेत. मुंबई महापालिकेत तीन वेळा नगरसेवक होण्याचा मान त्यांना मिळाला. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत समाधान सरवणकर हे देखील राजकारणात उतरले.
अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय
सदा सरवणकर तीन वेळा आमदार झाले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे देखील यंदाच्या निवडणुकीत सदा सरवणकर यांच्या विरोधात मैदानात होते. मात्र, दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंची लढत झाल्याने थेट सदा सरवणकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
वॉर्ड क्रमांक 194 येथून शिवसेनेतर्फे नगरसेवक
शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यांपैकी एक सदा सरवणकर असून पक्षाच्या काही मोठ्या जबाबदाऱ्या या समाधान सरवणकर यांच्यावर आहेत. दादर, प्रभादेवी, वरळी या भागात सरवणकर कुटुंबियांचे राजकीय वलय बघायला मिळते. समाधान सरवणकर वॉर्ड क्रमांक 194 येथून शिवसेनेतर्फे नगरसेवक होते. आता सध्या ते शिवाजी पार्क जिमखान्याचे ते उपाध्यक्ष आहेत. अचानक समाधान सरवणकर यांनी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा साखरपुडा पार पडलाय.