अन् त्या क्षणापासून माधुरी दीक्षितने ठरवलं की अनिल कपूरसोबत काम नाही करायचं… असं काय घडलं होतं सेटवर?

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय राहिलेली जोडी म्हणजे माधुरी आणि अनिल कपूर. या जोडीने अनेक सुपरहीट चित्रपट दिले पण सोबतच यांच्या अफेरच्या चर्चाही येऊ लागल्या होत्या. पण एक दिवस सेटवर अस काही घडलं की त्यानंतर माधुरीने पुन्हा अनिल कपूरसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.

अन् त्या क्षणापासून माधुरी दीक्षितने ठरवलं की अनिल कपूरसोबत काम नाही करायचं... असं काय घडलं होतं सेटवर?
Madhuri Dixit Anil Kapoor
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 15, 2025 | 1:20 PM

बॉलिवूडमध्ये 90 च्या अशा काही सुपरहीट जोड्या आहेत ज्यांनी फक्त चित्रपटच सुपरहीट दिले नाहीत तर त्यांच्या जोड्यांची चर्चा आजही केली जाते. त्यातीलच एक जोडी म्हणजे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित. या जोडीने सुपरहीट चित्रपट दिले आहेत. आणि प्रेक्षकांना या दोघांची जोडीही पसंतीस पडली. त्यामुळे ही जोडी असलेले जवळपास सर्वच चित्रपट हिट ठरले.

माधुरी आणि अनिलच्या अफेअरबद्दलच्या चर्चा

माधुरी आणि अनिलचा पहिला चित्रपट ‘तेजाब’ होता. जेव्हा अनिल कपूरला कळले की या चित्रपटात माधुरी त्याच्यासोबत असेल, तेव्हा त्याने एक वक्तव्य तिच्याबद्दल केलं होतं ते म्हणजे अनिल कपूर म्हणाले होते की. ‘माधुरी दिसायला सुंदर आहे पण ती कॅबरे डान्सरसारखी दिसत नाही.’ या चित्रपटाची कथा एका डान्सरची होती. जेव्हा माधुरीने ऑडिशन दिले तेव्हा तिची या भूमिकेसाठी अगदी सहज निवड झाली. यामुळे तिला चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली. ही कहाणी माधुरीचे आधीचे मॅनेजर रिक्कू राकेश नाथ यांनी एका मुलाखतीदरम्यान उघड केली. त्याच मुलाखतीत रिक्कूने माधुरी आणि अनिलच्या अफेअरबद्दल एक मोठे विधानही केले होते.

“तो खूप भावनिक आहे…”

रिक्कूच्या मते, अनिल आणि माधुरीने चार चित्रपटांमध्ये काम केले होते पण तोपर्यंत त्यांच्या प्रेमसंबंधाची कोणतीही बातमी नव्हती. कारण त्या चित्रपटांमध्ये दोघांमध्ये कोणतेही हॉट सीन नव्हते.1989 मध्ये एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा माधुरीला अनिल कपूरसोबतच्या तिच्या अफेअरबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, ‘मी अशा व्यक्तीशी कधीही लग्न करणार नाही. तो खूप भावनिक आहे. मला माझा नवरा पूर्णपणे शांत हवा आहे. मी अनिलसोबत अनेक चित्रपट केले आहेत, त्यामुळे आम्ही फक्त चांगले मित्र म्हणूनच ठिक आहोत.”

जेव्हा अनिलची पत्नी मुलांसह थेट सेटवर पोहोचली

एक काळ असा होता की माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यामुळे या दोघांची जोडी असणारे चित्रपच हे हिटच व्हायचे. एका रिपोर्टनुसार, जेव्हा माधुरी आणि अनिल कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा जास्तच व्हायला लागल्या तेव्हा एकदा हे दोघेही चित्रपटाची शुटींग करत असताना अनिल कपूरची पत्नी सुनीता त्या चित्रपटाच्या सेटवर थेट मुलांसह पोहोचली. जेव्हा माधुरीने अनिल कपूर यांना त्यांच्या कुटुंबासोबत बोलताना पाहिलं तेव्हा तिच्या हे लक्षात आलं की प्रकरण फारच गंभीर होत चाललं आहे. तेव्हा तिने त्या चित्रपटानंतर भविष्यात पुन्हा अनिल कपूरसोबत काम करायचं नाही असा निर्णय घेतला.

त्या क्षणी माधुरीने अनिलसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला

धुरीला तिच्या आणि अनिल कपूर यांच्या अफेअरच्या अफवांमुळे त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त व्हायला नको होता. त्यामुळे तिने अनिल कपूरपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. रिपोर्ट्सनुसार, माधुरीने एका मुलाखतीत असेही म्हटले आहे की, ती कधीही असे काहीही करू शकत नाही ज्याचा अनिलयांच्या कुटुंबावर परिणाम होईल.तेव्हा पासून या जोडीने एकत्र काम करणं शक्यतो टाळलं. त्यानंतर थेट 17 ते 18 वर्षानंतर इंद्र कुमार यांच्या ‘टोटल धमाल’ या चित्रपटात दिसली.तेव्हाही लोकांनी त्यांना तेवढीच पसंती दिली.