समंथाने गुपचूप लग्न केलं, पण लग्नासाठी लिंग भैरवीचेच मंदिर का निवडले? का आहे त्याचं एवढं महत्त्व?
अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने नुकतेच राज निदिमोरूशी तामिळनाडूतील लिंग भैरवी मंदिरात गुपचूप लग्न केले. या लग्नासाठी तिने निवडलेले मंदिर आणि भूत शुद्धी विवाह पद्धत सध्या चर्चेत आहे. सर्वांनाच त्या मंदिराबद्दल, देवीबद्दल अन् भूत शुद्धी विवाह पद्धतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तसेच समांथाने लग्नासाठी लिंग भैरवी मंदिरच का निवडले? या मंदिराचे नक्की महत्त्व काय आहे? जाणून घेऊयात.

अभिनेत्री समांथा रूथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरू विवाहबंधनात अडकले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समांथाने राजशी तामिळनाडूतील लिंग भैरवी मंदिरात शांतपणे लग्न केले. समांथाने अचानक लग्नाचे फोटो शेअर केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा अन् सुखद धक्का बसला. लग्नात फक्त 30 लोक उपस्थित होते. या खाजगी लग्नात समांथाने पारंपारिक लाल साडी परिधान केली होती. अलीकडेच समांथाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर लग्नाचे फोटो पोस्ट केले ज्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
समांथाच्या लग्नाची चर्चा तर होते पण त्याला आणखी दोन कारण आहेत एक म्हणजे तिने लग्नासाठी निवडलेलं लिंग भैरवीचेच मंदिर आणि भूत शुद्धी विवाह पद्धत. यो दोन्हीबद्दल चाहत्यांनाही जाणून घेण्यास उत्सुकता आहे. त्यामुळे लग्नाची भूत शुद्धी विवाह पद्धत आणि मंदीर सध्या फारच चर्चेत आहे.
भूत शुद्धी विवाह पद्धत
भूत शुद्धी विवाह पद्धत हा एक प्राचीन योगिक विधी आहे. या विधीदरम्यान विवाहाच्या पवित्र बंधनापूर्वी जोडप्याच्या शरीरातील पाच घटकांना म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांना शुद्ध करतो. या विधीद्वारे जोडप्यामध्ये गहिरं आणि दिव्य संबंध स्थापिक केला जातो. त्यांना मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिकरित्या शुद्ध केलं जातं. भूत शुद्धी विवाह हा ईशा फाऊंडेशनने केलेला एक विवाह विधी आहे.
लग्नासाठी लिंग भैरवीचेच मंदिर का निवडले?
हे मंदिर त्याच्या शांततापूर्ण उर्जेसाठी आणि आध्यात्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते. समंथा आणि राज यांच्या नात्याबद्दलच्या अफवा गेल्या काही काळापासून पसरत आहेत. आता, या जोडप्याने तामिळनाडूतील कोइम्बतूरजवळील ईशा योग केंद्रात सद्गुरूंनी स्थापन केलेल्या लिंग भैरवी मंदिरात लग्न केले आहे.
View this post on Instagram
देवी सुख आणि समृद्धी आणते
ईशा फाउंडेशनच्या वेबसाइटनुसार, हे मंदिर लिंग भैरवी देवीला समर्पित आहे, जिला स्त्री शक्तीचे सर्वोच्च रूप मानले जाते. ती तिच्या भक्तांचे रक्षण करते आणि त्यांना आनंद आणि समृद्धी देते असे मानले जाते.
मंदिराच्या भिंती उलट्या त्रिकोण आकारात
देवीच्या मंदिराची रचना स्त्रीशक्तीचे प्रतीक मानली जाते. मंदिराच्या भिंती उलट्या त्रिकोणाच्या आकारात बांधल्या गेल्या आहेत. जो सृष्टीच्या गर्भाचे प्रतीक मानले जाते. आत, एक उभा त्रिकोण आहे, जो पुरुषी उर्जेचे प्रतीक आहे, जो सृष्टीच्या गर्भात अजूनही असलेल्या उर्जेचे प्रतिनिधित्व करतो. ही माहिती वेबसाइटवर दिली आहे.
लिंग भैरवी मंदिरात कसे जायचे?
लिंग भैरवी मंदिर हे तामिळनाडूतील कोइम्बतूरपासून सुमारे 30 किलोमीटर पश्चिमेस स्थित आहे. कोइम्बतूर हे दक्षिण भारतातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे आणि ते हवाई, रेल्वे आणि रस्त्याने चांगले जोडलेले आहे. चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथून कोइम्बतूरला नियमित उड्डाणे उपलब्ध आहेत. भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख शहरांमधून कोइम्बतूरला गाड्या देखील धावतात. कोइम्बतूरहून ईशा योग केंद्राला थेट बसेस देखील उपलब्ध आहेत. विमानतळ आणि रेल्वे स्थानक दोन्हीवरून टॅक्सी सहज उपलब्ध आहेत. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही ईशा योग केंद्राच्या ट्रॅव्हल डेस्कवरून टॅक्सी देखील बुक करू शकता.
