शाहरुख खानला का मिळाला लाल रंगाचा पासपोर्ट? काय आहे असं त्यात खास?
भारतात, पासपोर्ट तीन रंगात उपलब्ध आहेत. निळा, जो बहुतेक लोकांकडे असतो. दुसरा पांढरा आणि तिसरा लाल किंवा तपकिरी रंगाचा. जो की सर्वांनाच दिला जात नाही. तो फार खास पासपोर्ट मानला जातो. पण आता हा खास लाल रंगाचा असणारा पासपोर्ट शाहरूख खानला मिळाला आहे. नक्की या पासपोर्टची खासियत काय आहे? त्याचा अर्थ काय असतो? जाणून घेऊयात.

आता जवळपास 70 ते 80 टक्के लोकांकडे पासपोर्ट हा असतोच. पासपोर्ट हा सहसा निळ्या रंगाचा असतो आणि जेव्हा कोणी परदेशात प्रवास करतो तेव्हा त्यावर शिक्का मारलेला असतो. जगभरात असे अनेक देश आहेत जिथे तुम्ही पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय प्रवास करू शकत नाही. भारतात निळ्या रंगाव्यतिरिक्त इतर रंगांचे पासपोर्टही आहेत, ज्यांचे वेगवेगळे उपयोग आणि अर्थ असतात. यांपैकी लाल पासपोर्ट सर्वात खास मानला जातो. भारतात फक्त काही लोकांकडेच हा पासपोर्ट उपलब्ध असतो ज्यामध्ये आता बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. शाहरुख खानला हा लाल पासपोर्ट मिळाला आहे. पण या लाल पासपोर्टचा नेमका कशासाठी उपयोग होतो आणि त्याची खासियत काय आहे ते जाणून घेऊयात.
पासपोर्टमध्ये किती रंग असतात?
भारतात, पासपोर्ट तीन रंगात उपलब्ध आहेत. सर्वात सामान्य म्हणजे निळा, जो बहुतेक लोकांकडे असतो. दुसरा पांढरा आणि तिसरा लाल किंवा तपकिरी रंगाचा असतो. हे सर्व परदेश प्रवासासाठी उपयुक्त असतता. परंतु एखाद्याकडे जर लाल रंगाचा पासपोर्टचा असणे खास असते.
निळे आणि पांढरे पासपोर्ट
निळ्या पासपोर्टमुळे लोक कामासाठी, व्यवसायासाठी, प्रवासासाठी किंवा शिक्षणासाठी परदेशात प्रवास करू शकतात. तर अधिकृत कारणांसाठी परदेशात प्रवास करणाऱ्यांना पांढरा पासपोर्ट दिला जातो. या पासपोर्टमुळे सरकारी अधिकाऱ्यांना इमिग्रेशनची सोय आणि सुरक्षा तपासणीसह विविध फायदेही मिळतात.
लाल रंगाचा पासपोर्टचा उपयोग कशासाठी?
निवडक व्यक्तींनाच हा लाल किंवा तपकिरी रंगाचा एक विशेष पासपोर्ट दिला जातो. ज्यांच्याकडे हा पासपोर्ट आहे त्यांना बहुतेक देशांसाठी व्हिसा आवश्यकतांमधून सूट मिळते आणि त्यांना इमिग्रेशन प्रक्रियेतून देखील सूट मिळते. काही व्हीव्हीआयपी आणि राजकीय मंडळींनाच या प्रकारचा पासपोर्ट मिळतो. तो ई-पासपोर्ट स्वरूपात देखील जारी केला जातो. या पासपोर्टसाठी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) कडून अनेक परवानग्या आवश्यक असतात. सगळची तपासणी. पडताळणी करूनच हा पासपोर्ट करूच हा पासपोर्टचा दिला जातो. भारतात हा खास पासपोर्ट शाहरुख खानसह काही निवडक व्यक्तींकडेच आहे.
म्हणूनच शाहरूखची लोकप्रियता पाहता, त्याचा प्रवास पाहता त्याला हा लाल रंगाचा पासपोर्ट देण्यात आला आहे.
