
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा पहिला शो “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आला होता. त्याचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहते हा शो पाहण्यासाठी उत्सुक होते. याचं मुख्य कारण होतं अर्थातच आर्यन खान. कारण शाहरूख खानने बॉलिवूडवर राज्य केलं आता त्याचा लेक काय कमाल करतोय हे पाहण्याची उत्सुकता नक्कीच सर्वांमध्ये होती. तसेच त्याने इतर स्टारकिड्सप्रमाणे अभिनय नाही तर थेट दिग्दर्शन स्वीकारलं. त्यामुळे एवढी मोठी जबाबदारी त्याने पेलवली कशी? याबद्दल सर्वांना त्याचे कौतुकही वाटत होते.
आर्यन खान कॅमेऱ्यासमोर हसत का नाही?
पण आर्यनबाबतचा अजून एक प्रश्न चाहत्यांना पडला होता. तो म्हणजे आर्यन खान कॅमेऱ्यासमोर हसत का नाही? तो फार क्वचितच कॅमेऱ्यासमोर हसताना दिसला आहे. “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” च्या प्रमोशनवेळी देखील आर्यन गंभीरच दिसत होता. याबद्दल या चित्रपटाचा भाग असलेला अभिनेता राघव जुयालने यामागील कारण उघड केले आहे. आर्यन का हसत नाही याचा खुलासा केला आहे.
तो हसायला घाबरतो
एका मुलाखतीदरम्यान, राघव जुयालने याचं उत्तर दिल आहे. आर्यन खानबद्दल राघव म्हणाला की “आर्यन कॅमेऱ्यासमोर हसायला घाबरतो. तो कॅमेऱ्यासमोर हसत नाही. त्याला एक प्रकारचा अॅटिट्यूड ठेवायला आवडतो. पण तो आमच्यासोबत जेव्हा असतो तेव्हा त्याने मजाही केली आहे. त्याच्यात लहान मुलांसारखी ऊर्जा आहे. पण त्याची कॅमेऱ्यासमोर वावरण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. जी मला खूप आवडते आणि मुलींनाही आवडते.”
मी एक दिवस आर्यनला नक्कीच हसवीन
राघव पुढे म्हणाला की, “मी त्याला सांगितले आहे की एक दिवस मी तुला कॅमेऱ्यासमोर नक्कीच हसवीन. मात्र, तो म्हणाला, ‘नाही , असं करू नकोस.’ तेव्हापासून, जेव्हा जेव्हा तो मला भेटतो तेव्हा मी त्याला सांगतो की मी तुला नक्कीच हसवीन.” दरम्यान,राघवसोबत मुलाखतीत त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या लक्ष्य लालवाणीने आर्यनबद्दल सांगितले की,” जरी तो हसला तरी त्याचे फोटो कधीही बाहेर येणार नाहीत.”
तसेच आर्यन खानही कधीच कॅमेऱ्यासमोर फार काही बोलताना दिसला नाही. त्याने दरवेळी त्याचा तोच गंभीर अन् शांत अॅटीट्यूड ठेवणे पसंत केले आहे.
द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिज
18 सप्टेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत बॉलिवूडची कहाणी दाखवण्यात आली आहे. लक्ष्य लालवानी आणि राघव जुयाल यांच्याव्यतिरिक्त, बॉबी देओल, सहेर बंबा आणि मोना सिंग हे देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. याशिवाय, या शोमध्ये अनेक स्टार्सचे कॅमिओ आहेत. यामध्ये करण जोहर, शाहरुख खान, रणवीर सिंग, सलमान खान आणि आमिर खान आणि इतर अनेक स्टार्सचा समावेश आहे.