AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू खरातच्या चित्रपटात दीपाली सय्यद चाकणकरांची भूमिका साकारणार? दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात चांगलाच चर्चेत आहे. आता खरातच्या आयुष्यावर चित्रपट येणार असून त्यात दीपाली सय्यद दिलणार असल्याचे समोर आले आहे.

भोंदू खरातच्या चित्रपटात दीपाली सय्यद चाकणकरांची भूमिका साकारणार? दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...
Deepali SayadImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 27, 2026 | 2:18 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंदू अशोक खरातने प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे दैवी शक्ती असल्याच्या नावाखाली लैंगिक शोषण आणि बलात्कर केले. महिलांसोबत चुकीचे कृत्य केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच अशोक खरातने अनेक शेतकऱ्यांना फसवून त्यांची जमीन नावावर करुन घेतल्याचा देखील प्रकार उघडकीस आला. महिलांच्या तक्रारीनंतर अशोक खरात तुरुंगात आहे. तसेच त्याची ईडीकडूनही चौकशी होत आहे. दरम्यान, अशोक खरातच्या कानाम्यांवर चित्रपट येत असल्याची माहिती समोर आली आहे.

रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दीपाली सय्यद

अशोक खरात आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे देखील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आता खरातच्या जीवनावर सिनेमा येत असल्यामुळे या चित्रपटात रुपाली चाकणकर यांची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद ही भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. आता यावर दीपाली सय्यदने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

दीपाली सय्यदने दिली प्रतिक्रिया

टीव्ही ९ मराठीशी खरात सिनेमावर बोलताना दीपाली सय्यद म्हणाली, भोंदूबाबा अशोक खरातची मला कल्पनाच नव्हती. बाहेर आल्यानंतर (बिग बॉसच्या घरातून) कळलं की असा एक भोंदूबाबा आला आणि त्याने पूर्ण हलवून टाकलं सगळीकडे. पण चित्रपट मी काढत नाहीये हा चित्रपट दुसरं कोणी काढतंय. प्रोड्युसर मी नाहीये. पण मी कलाकार म्हणून त्या चित्रपटात दिसणार आहे. लवकरच मी तुमच्यासमोर येणार आहे. रुपाली ताईंबरोबर जे काही झालं असेल ते इतके वर्षापासून आहे. त्याने ती जी गोष्ट आहे ती हँडल केली ते ही आहे.

भोंदूबाबा खरातचे सत्य आणि या प्रकरणातील राजकीय पडद्यामागच्या घडामोडी या चित्रपटातून उलगडणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे दीपाली सय्यद यांची भूमिका आणि चित्रपटाचे कथानक याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल