सर्वांसमोर हिंदी बोलताना यशकडून झाली ही चूक; रकुलसह रवी दुबेलाही हसू अनावर

'रामायणम्' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अभिनेता यशने हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याच्याकडून झालेला चुकीचा उच्चार ऐकून अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि रवी दुबेला हसू अनावर झालं.

सर्वांसमोर हिंदी बोलताना यशकडून झाली ही चूक; रकुलसह रवी दुबेलाही हसू अनावर
यश, रकुल प्रीत सिंह
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 20, 2026 | 12:47 PM

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर येत्या 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात चित्रपटातील मुख्य कलाकार उपस्थित होते. ‘केजीएफ’ स्टार यश यामध्ये रावणाच्या भूमिकेत आहे. ट्रेलर लाँच कार्यक्रमात त्याने हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्याकडून थोडीफार चूक झाली. यशच्या तोंडून चुकीचे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेल्या रकुल प्रीत सिंह आणि रवी दुबे यांना हसू अनावर झालं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रावणाच्या भूमिकेसाठी निवड केल्याबद्दल निर्माते नमित मल्होत्रा यांचे आभार मानताना यशने ‘अवसर’ या शब्दाऐवजी ‘अवकाश’ असा उल्लेख केला. जेव्हा यशला मंचावर बोलावण्यात आलं, तेव्हा तो म्हणाला, “इथे सर्वजण हिंदीत बोलत आहेत, मीसुद्धा प्रयत्न करेन. या चित्रपटाच्या टीमसोबत काम करताना मला माझी हिंदी सुधारण्याची संधी मिळाली.” याचदरम्यान पुढे त्याच्याकडून काही चुकीचे उच्चार होतात. तेव्हा रवी दुबे आणि रकुल एकमेकांकडे पाहून हसू लागतात. या चित्रपटात रकुल शूर्पणखेच्या भूमिकेत आहे.

पहा यशचा व्हिडीओ

रामायणम् हा चित्रपट म्हणजे भारताचं स्वप्न आहे. आम्ही सर्वजण एक विचार आणि एका हेतूने एकत्र आलो आहोत. ही कथा आम्हाला जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे”, अशा शब्दांत यश व्यक्त झाला. यश हा कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. त्याचे ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. आता ‘रामायण’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपटसृष्टीत काम करतोय.

या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत आहे. अभिनेता सनी देओलची निवड हनुमानाच्या भूमिकेसाठी करण्यात आली असून रवी दुबे यामध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. तब्बल 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

Follow Us