KGF 3 बद्दल मोठी अपडेट, 4 वर्षांपासून गायब असलेल्या यशचा जलवा, 5 सिनेमांबद्दल मोठी अपडेट समोर…

KGF सिनेमाच्या 2 भागांनंतर KGF 3 च्या प्रतीक्षेत चाहते... 4 वर्षांपासून कुठे गायब होता सुपरस्टार यश, अभिनेत्याच्या 5 सिनेमांबद्दल मोठी अपडेट सुरु... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता यश याचीच चर्चा...

KGF 3 बद्दल मोठी अपडेट,  4 वर्षांपासून गायब असलेल्या यशचा जलवा, 5 सिनेमांबद्दल मोठी अपडेट  समोर...
अभिनेता यश
| Updated on: Jun 22, 2026 | 8:36 AM

बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपेक्षा आता चाहत्यांमध्ये साऊथच्या अभिनेत्यांची क्रेझ अधिक दिसून येते. साऊथ इंडस्ट्रीतील असा एक अभिनेत्या ज्याने तरुणांना वेड लावलं आहे, तो म्हणजे अभिनेता यश. केजीएफ प्रदर्शित झाल्यानंतर यश कोणत्यात सिनेमात दिसला नाही. तब्बल चार वर्ष यश मोठ्या पडद्यापासून दूर होता. पण आता एक दोन नाही तर, तब्बल पाच सिनेमांच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे 2026 – 2027 हे वर्ष यशचं असेल असं म्हणायला हरकत नाही. तर जाणून घ्या यश याच्या अपकमिंग सिनेमांबद्दल…

‘फादर्स डे’ चं निमित्त साधत यशने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज…

‘फादर्स डे‘च्या विशेष निमित्ताने, यशने सोशल मीडियाद्वारे त्याच्या ‘टॉक्सिक’ (Toxic) या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. पोस्ट शेअर करताना अभिनेता म्हणाला “आपल्या वडिलांचा आदर करा… #Toxic आता 26 ऑगस्ट पासून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये.”, सांगायचं झालं तर, सिनेमात यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत, हुमा कुरेशी, अक्षय ओबेरॉय आणि मल्याळम स्टार टोविनो थॉमस हे सेलिब्रिटी महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘केजीएफ 3’ ची प्रतीक्षा

यशच्या ‘केजीएफ’ या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सिनेमाची कथा तयार असल्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होऊ शकते; मात्र, प्रदर्शनाची तारीख किंवा या सिनेमात यशचा सहभाग यांबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.

‘रामायण भाग 1’ मध्ये रावणाची भूमिका

दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण भाग 1’ या महत्त्वाकांक्षी सिनेमात यश रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या भागात अभिनेत्याचा स्क्रिन टाईम फार कमी असेल, असं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यश या सिनेमाचा सह-निर्माताही आहे. हा सिनेमा 2026 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

‘रामायण भाग 2’ मध्ये वाढेल यशचा प्रभाव…

‘रामायण भाग 2’ मध्ये यश याचा प्रभाव ‘रामायण भाग 1’ पेक्षा अधिक आणि प्रभावशाली असेल… यासिनेमाच्या दोन्ही भागांमध्ये यश याच्यासोबत रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि सनी देओल या सेलिब्रिटींची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे..

किराटका (Kirataka)

यशच्या ‘माय नेम इज किराटका’ सिनेमाची घोषणा घोषणा जुलै 2018 मध्ये करण्यात आली होती. हा 2011 मधील ‘किराटका’ या रोमँटिक-कॉमेडी सिनेमाचा सिक्वेल आहे. सुरुवातीला सिनेमा होल्डवर ठेवण्यात आल्याची चर्चा होती; मात्र, 2019 मध्ये निर्माते जयन्ना यांनी स्पष्ट केलं की हा प्रोजेक्ट थांबलेला नाही आणि त्यावर काम सुरू आहे. तरीही, त्यानंतर या सिनेमाबाबत कोणतीही नवीन माहिती समोर आलेली नाही.

Follow Us