AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेतन्याहूंचा खेळ खल्लास, हा नेता होणार इस्रायलचा नवा पंतप्रधान; अरब पक्ष ठरले किंगमेकर

इस्रायल निवडणुकीत नेतन्याहूंच्या नेतृत्वाखालील सरकारचा खेळ खल्लास होण्याची चिन्हे आहेत. अरब पक्ष किंगमेकर ठरले असून, त्यांनी विरोधी पक्षाचे नेते गादी आयजेनकोट यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आयजेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. मात्र, आयजेनकोट यांच्या आघाडीतील एका पक्षाने अरब पक्षांसोबत सरकारमध्ये सामील होण्यास विरोध दर्शविल्याने पेच निर्माण झाला आहे.

नेतन्याहूंचा खेळ खल्लास, हा नेता होणार इस्रायलचा नवा पंतप्रधान; अरब पक्ष ठरले किंगमेकर
netanyahuImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 5:17 PM
Share

इस्रायलची निवडणूक पार पडली असून देशात कुणाचं सरकार येणार याचं चित्र येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती इसहाक हर्जोग हे रविवारी नव्या सरकारची घोषणा करणार आहेत. विरोधी पक्षाचे नेते गादी आयजेनकोट यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मोठ्या संख्येने शिफारशी आल्या आहेत. या निवडणुकीत अरब पक्ष किंगमेकर ठरले आहेत. त्यांनी सुद्धा राष्ट्रपतींशी चर्चा करून आयजेनकोट यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा खेळ खल्लास झाला असल्याचं बोललं जात आहे.

इस्रायली संसद नेसेटमध्ये 120 सदस्य आहेत. नेतन्याहू यांच्या आघाडीने 53 जागांवर विजय मिळवला आहे. तर आयजेनकोट यांच्या आघाडीने 48 जागा जिंकल्या आहेत. तर अरब पक्षांनी विक्रमी 19 जागा जिंकून संपूर्ण खेळ आपल्या हातात घेतला आहे. निवडणूक निकाल घोषित होताच अरब पक्षांनी आयजेनकोट यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे विरोधकांची साथ मिळाल्याने आयजेनकोट हे इस्रायलचे नवे पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, रविवारीच याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे.

अडचण काय?

आयजेनकोट यांच्या आघाडीतील दक्षिणपंथी पार्टी इस्रायल बेइतेनूने विरोधाचा सूर आवळला आहे. अरब पक्षांच्या पाठिंब्यावर टिकलेल्या सरकारमध्ये आम्ही सामील होणार नाही, असं इ्स्रायल बेइतेनूने म्हटलं आहे. या पक्षाचे नेते अविगडोर लिबरमॅन यांनी याचं कारणही स्पष्ट केलं आहे. अरब पक्षांनी हमासला जाहीरपणे दहशतवादी संघटना म्हणायला नकार दिला आहे. त्यामुळेच आम्ही अरब पक्षांचा पाठिंबा मिळवून सरकार स्थापन करणाऱ्या कोणत्याही सरकारमध्ये जाणार नाही, असं अविगडोर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आयजेनकोट यांच्यासमोरचं संकट अजून काही टळलेलं नाहीये.

दुसरीकडे नेतन्याहू यांचा अनेक वर्षापासूनचा सहकारी पक्ष यूनायटेड तोराह जुडैज्मने राष्ट्रपतींची भेट घेतली. पण नेतन्याहू यांना पंतप्रधान करण्याची शिफारस या मित्र पक्षाने केली नाही. मात्र, त्यांनी आयजेनकोट यांचंही समर्थन केलेलं नाही. असं असलं तरी मित्र पक्षाच्या मौनामुळे नेतन्याहू यांना मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे.

61 जागांची गरज

नेसेटमध्ये बहुमतासाठी 61 जागांची आवश्यकता आहे. नेतन्याहू आणि आयजेनकोट या दोघांनीही बहुमत मिळालेलं नाही. सर्व खेळ आता अरब पक्षांच्या हातात आहे. अरब पक्ष आयजेनकोट यांच्या पाठी आहेत. पण एक मित्र पक्ष मात्र अरब पक्षांच्या विरोधात असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी सर्वच राजकीय पक्षांशी चर्चा सुरू केली आहे. या चर्चेनंतरच रविवारी देशाचा नवा पंतप्रधान जाहीर होणार आहे. यावेळी आयजेनकोट यांना लॉटरी लागते की नेतन्याहू काही चमत्कार घडवतात याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण