
‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मा लग्न बंधनात अडकली आहे.

एवलिननं पती डॉ. तुषान भिंडीसोबत एक फोटो शेअर करत ही घोषणा केली आहे.

एवलिन आणि तुषानचं ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेनमध्ये लग्न झालं. त्यांच्या लग्नाचा फोटो बघताच आता एवलिनचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.

एवलिननं तुषानसोबत एक फोटो शेअर केला आणि लिहिलं- 'फॉरएव्हर'. तिच्या या फोटोवर एली अवराम, रोशेल राव, सोफी चौधरी, लिसा हेडॉन यांच्यासह अनेक सेलेब्स आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटोमध्ये एवलिन व्हाइट वेडिंग गाऊनमध्ये अप्रतिम दिसत आहे. तिचा नवरा तुषाननं काळा सूट परिधान केला आहे.

दीड वर्षापूर्वी तुषान आणि एवलिनचा साखरपुडा झाला होता. ज्याचे फोटो मोठ्या प्रमाणाच व्हायरल झाले होते.