तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही…, महिला शिवसेना नेत्यावर प्रसिद्ध कॉमेडियनचा संताप, महाराष्ट्रात शोसाठी नाकारली जातेय परवानगी

गेल्या काही महिन्यांपासून काही कॉमेडियन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या काही कॉमेडी व्हिडीओचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल होताच खळबळ उडाली. .आता महिला शिवसेना नेत्यांनी देखील यावर आक्षेप घेतल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा याने पोस्ट करत, तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही... असं लिहिलं आहे.

तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही..., महिला शिवसेना नेत्यावर प्रसिद्ध कॉमेडियनचा संताप, महाराष्ट्रात शोसाठी नाकारली जातेय परवानगी
| Updated on: Jul 01, 2026 | 12:39 PM

प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन कुणाल कामरा याने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काही वक्तव्य केलेले. ज्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होत. एवढंच नाही तर, एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कुणाल कामरा याच्या स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड देखील केलेली. शिवाय कुणाल कामरा याच्याविरोधात एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली… पण समितीसमोर दिलेल्या कुणाल यांनं म्हणटलेलं की, मी केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही; मात्र, आता हे संपूर्ण प्रकरण वेगळं वळण घेत असल्याचे दिसून येत आहे.

सांगायचं झालं तर, नुकताच, शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. प्रणित मोरेच्या शोमधील ‘370 की बिर्याणी’ त्या भागावरून देखील मनीषा कायंदे यांनी निशाणा साधल आणि म्हणाल्या, सध्या विनोदाचा ट्रेंड वाढत आहे आणि हे कलाकार सर्व मर्यादा ओलांडत आहेत., प्रणित मोरे याच्या शोनंतर देखील चांगलंच वातावरण तापलं होतं.

 

 

मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘कॉमेडीच्या नावाखाली काही लोकं काहीही बोलत आहेत. त्यांची मर्यादा ते ओलांडत आहेत आणि असे कॉमेडी शो बंद करण्यासाठी प्रस्ताव मांडतील…’, या पलटवार करत कुणाल कामरा याने स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे… कुणार याच्या म्हणण्यानुसार, जेव्हापासून त्यांने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, तेव्हापासून त्याला महाराष्ट्रात एकही कार्यक्रम घेण्याची परवानगी मिळालेली नाही.

कुणाल कामरा याचा संताप…

सोशल मीडियावर एक पोस्ट करत कुणाल कामरा म्हणाला, ‘मला असं वाटतं की, महाराष्ट्र राज्यातील आमदार आमचे घटनात्मक अधिकार पुन्हा लिहिण्याच्या विचारात आहे… त्यांनी मला फक्त आणि फक्त सततच्या कायदेशीर प्रक्रियेत अडकवून ठेवलं आहे… एवढंच नाही तर, मला महाराष्ट्रात शो करण्याची संधी मिळू नये याची देखील ते खबरदारी घेत आहेत.’

पुढे कुणाल म्हणाला, ‘मनीषा कायंदे यांना मला आणखी शिक्षा द्यायची आहे… पण तुमच्या पोकळ धमक्यांमुळे माझं काम थांबणार नाही. तुम्ही देखील पक्षातील लोकांना खूश ठेवण्यासाठी असे वक्तव्य करणं बंद करा आणि तुमच्या कामाला सुरुवात करा…’, सध्या कुणाल कामरा याची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

Follow Us