AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Youtuber अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकत्र प्रेग्नंट; नेटकऱ्यांना आली जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्याची आठवण

"लाज नाही वाटत का तुम्हाला?", युट्यूबरच्या दोन्ही पत्नी एकत्र गरोदर असल्याचं पाहून भडकले नेटकरी

Youtuber अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकत्र प्रेग्नंट; नेटकऱ्यांना आली जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्याची आठवण
Youtuber अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकत्र प्रेग्नंटImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 11, 2022 | 10:31 AM
Share

हैदराबाद: हैदराबादचा प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. अरमानच्या दोन पत्नी आहेत आणि दोघीही एकत्रच गरोदर आहेत. 15 लाख फॉलोअर्स असलेल्या या युट्यूबर आणि कंटेट क्रिएटरने त्याच्या दोन्ही पत्नींसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र या पोस्टवरून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. पायल आणि कृतिका अशी त्याच्या पत्नींची नावं आहेत.

काही नेटकऱ्यांनी युट्यूबर अरमान मलिकची खिल्ली उडवली. तर काहींनी तो दुसऱ्या पत्नीवर पहिल्या पत्नीपेक्षा अधिक प्रेम करत असल्याचा दावा केला. ‘हे तिघं एकत्र कसे राहू शकतात? काहीतरी लाज बाळगा’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘पहिल्या पत्नीवर प्रेम केलं असतं तर दुसरी पत्नी का आणली असती’, असा सवाल दुसऱ्याने केला.

अरमानने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये कृतिका आणि पायल या बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहेत. ‘भारताच्या लोकसंख्या वाढीत हातभार लावल्याबद्दल तुमचं नाव स्वर्णाक्षरात लिहिलं जाईल’, अशीही उपरोधिक टीका नेटकऱ्यांनी केली.

एका युजरने जुळ्या बहिणींना लग्न केल्याच्या घटनेचाही उल्लेख केला. ‘मी अशा भारतातून आहे, जिथे दोनदा लग्न केल्यानंतर अरमान त्याचं आयुष्य आनंदाने जगतोय. तर दुसरीकडे जुळ्या बहिणींशी लग्न केल्यामुळे अतुलवर गुन्हा दाखल करण्यात आला’, असं त्याने लिहिलंय.

कोण आहे अरमान मलिक?

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे.

त्यानंतर 2018 मध्ये त्याने कृतिकाशी लग्न केलं. कृतिका ही पायलची खास मैत्रीण असल्याचंही म्हटलं जातं. दुसरं लग्न झाल्यानंतरही हे चौघं एकाच घरात एकत्र राहत आहेत. पायल आणि कृतिका यांचे अनेकदा एकत्र फोटो पहायला मिळतात.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.