Zubeen Garg : झुबीन गर्गच्या मृत्यूचं गूढ, सिंगापूर ते आसाम.. काय काय घडलं? वाचा A टू Z माहिती

या प्रकरणाची चौकशी करताना एसआयटीने गुवाहाटीमधील दोन्ही आरोपींच्या निवासस्थानांची झडती घेतली आहे. या छाप्यांदरम्यान महंता यांच्या निवासस्थानी सापडलेल्या साहित्याच्या आधारे त्यांच्याविरोधात सरकारी निधीचा गैरवापर, मनी लाँड्रिंग, फसवणूक आणि बनावटगिरी केल्याबद्दल अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Zubeen Garg : झुबीन गर्गच्या मृत्यूचं गूढ, सिंगापूर ते आसाम.. काय काय घडलं? वाचा A टू Z माहिती
zubeen garg
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2025 | 3:20 PM

लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्गचा 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला. ‘नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल’मध्ये परफॉर्म करण्यासाठी तो सिंगापूरला गेला होता. त्यावेळी तिथे स्कुबा डाइव्हिंग करताना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. केवळ आसामच नव्हे तर देशभरात झुबीनचा मोठा चाहतावर्ग असल्याच्या त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी आसामकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीकडून कसून चौकशी केली जात आहे. यादरम्यान आसाममधील झुबीनचे चाहते प्रचंड संतापले आहेत. सरकारकडून याप्रकरणी कोणती पावलं उचलली जात आहेत आणि या सर्वांचे राजकीय परिणाम काय झाले, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.. सिंगापूरमध्ये नेमकं काय झालं? 20 आणि 21 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. झुबीन या फेस्टिव्हलचा सांस्कृतिक ब्रँड अॅम्बेसेडर होता. त्यामुळे तोसुद्धा तिथे परफॉर्म करण्यासाठी गेला होता. फेस्टिव्हलच्या आधी 19 सप्टेंबर रोजी आसाम असोसिएशन सिंगापूरचे...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा