Navratri Days Colors : जाणून घ्या; ‘नऊ’रात्रींचे ‘नऊ’रंग आणि त्यांचे महत्व

| Updated on: Sep 25, 2022 | 6:19 PM

भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्व आहे, त्यामुळेच रंगांचा उत्सवही आपल्याकडे साजरा केला जातो, नवरात्रीचे नऊ रंग हे याच एकात्मकतेचे प्रतीक आहेत.

Navratri Days Colors : जाणून घ्या; नऊरात्रींचे नऊरंग आणि त्यांचे महत्व
Follow us on

भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्व आहे, त्यामुळेच रंगांचा उत्सवही आपल्याकडे साजरा केला जातो, नवरात्रीचे नऊ रंग हे याच एकात्मकतेचे प्रतीक आहेत. लाल, निळा आणि पिवळा या तीन रंगांना एकत्रितपणे त्रिमुर्ती म्हणून संबोधले जाते. याच मूळ रंगांच्या मिश्रणातून नारंगी, जांभळा, हिरवा यांसह इतर सर्व रंग तयार होतात.

जाणून घेऊयात यावर्षीच्या नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व

26 सप्टेंबर
रंग :- पांढरा
महत्त्व :-पांढरा रंग हा शांतता, निखळपणा, निस्वार्थ प्रेमाचं प्रतिनिधीत्व करतो. ‘शैलपुत्री’ देवीला पांढरा रंग खुप प्रिय आहे.

27 सप्टेंबर
रंग :- लाल
महत्त्व :- ‘ब्रम्हचारिणी’ देवीचा आवडता रंग लाल आहे. हा रंग शक्ती आणि उग्रता, पवित्रतेचे प्रतीक आहे.

हे सुद्धा वाचा

28 सप्टेंबर
रंग :- निळा
महत्त्व :- ‘चंद्रघंटा’ देवीचा आवडता रंग निळा आहे. हा रंग सत्य, शीतलता आणि स्निग्धता यांचे निदर्शक आहे.

29 सप्टेंबर
रंग :- पिवळा
महत्त्व :-माता कृष्णामांडाला ‘अष्टभुजा’ देवी या नावानेही ओळखले जाते. देवीचा आवडता रंग पिवळा आहे. पिवळा रंग संपत्तीचा, स्नेहाचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जातो.

30 सप्टेंबर
रंग :- हिरवा
महत्त्व :- हिरवा रंग स्कंदमाता देवीचा आवडता रंग आहे हा रंग, सौभाग्य, प्रकृती, विकास यांचे प्रतिनिधीत्व करतो.,

1 ऑक्टोंबर
रंग :- करडा
महत्त्व :- राक्षस महिषासुराचा वध करणारी देवी कात्यायनी. या देवीचा प्रिय रंग करडा आहे. हा रंग पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या मिश्रणातून बनवला जातो, आणि या दोन्ही रंगाचे गुणधर्म विरोधी आहेत. जे या रंगातून एकत्र येतात.

2 ऑक्टोंबर
रंग :- नारंगी
महत्त्व :- देवी पार्वतीचे सातवे रुप म्हणजे कालरात्री किंवा काली माता. या देवीचा आवडीचा रंग नारंगी आहे. हा रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.

3 ऑक्टोंबर
रंग :- मोरपंखी
महत्त्व :-महागौरी देवीचा हा खूप आवडीचा रंग आहे. नावाप्रमाणेच हा रंग मयूरता,सद्‍भावना, सुंदरता,समृध्दीचे प्रतीक आहे.

4 ऑक्टोंबर
रंग :- गुलाबी
महत्त्व :- अलौकिक शक्ति दाता म्हणजेच सिध्दीदात्री देवी. या देवीचा प्रिय रंग गुलाबी आहे. ऊर्जा, महत्वाकांक्षा, दृढ़ विश्वास आणि प्रेमाचे प्रतीक म्हणजे गुलाबी रंग.