1 एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात 'हे' बदल होणार

मुंबई : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. 2019-20 या आर्थिक वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात अनेक नवीन बदल होणार आहेत. यात स्वस्त घरापासून स्वस्त वीजबिलापर्यंत अनेक लाभ सर्वसामान्यांना घेता येणार आहे. स्वस्त घराचे स्वप्न होणार पूर्ण प्रत्येकाला आपले स्वत:चे हक्काचे घर असावे असं …

1 एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात 'हे' बदल होणार

मुंबई : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. 2019-20 या आर्थिक वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात अनेक नवीन बदल होणार आहेत. यात स्वस्त घरापासून स्वस्त वीजबिलापर्यंत अनेक लाभ सर्वसामान्यांना घेता येणार आहे.

स्वस्त घराचे स्वप्न होणार पूर्ण

प्रत्येकाला आपले स्वत:चे हक्काचे घर असावे असं वाटत असतं, पण गेल्या काही वर्षांपासून घराच्या किंमती  गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना घर घेणे परवडत नाही. दरम्यान 1 एप्रिलपासून बांधकाम क्षेत्रातील निर्माणाधीन घरांवरील अर्थात बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटीचे दर 12 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्यात आले आहेत. तर परवडणाऱ्या घरांवरील जीएसटी 8 टक्क्यांवरुन 1 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवरील कराचा बोजा कमी होऊन घर घेणं परवडू शकेल.

आता मोबाईलप्रमाणे लाईट बिल रिचार्ज

गेल्या कित्येक महिन्यांपासून सरकारकडे वारंवार वाढीव वीज बिलासंबंधित तक्रारी दाखल होत होत्या. या तक्रारी लक्षात घेता, सरकारने मोबाईल रिचार्जप्रमाणे वीज बील रिचार्ज करण्याची नवीन सुविधा सुरु केली आहे. येत्या 1 एप्रिलपासून वीज बिल रिचार्ज हा नवा पर्याय ग्राहकांसमोर ठेवण्यात येणार आहे. या नवीन पर्यायानुसार ग्राहकांना संपूर्ण महिन्याभराचे बील भरण्यापेक्षा, फक्त वापर करत असणारे वीजेचे बील भरावे लागणार आहे.

कर्जावरील व्याज कमी होणार

गेल्या काही वर्षांपासून विविध बँका कर्जांवरील व्याजाची रक्कम स्वत:च ठरवत होत्या. पण काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने  नियमावलीत काही बदल केले आहेत. या नव्या नियमावलीनुसार, आरबीआयच्या रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर लगेचच सर्व बँकांना कर्जावरील व्याज कमी करावे लागणार आहेत. यामुळे येत्या 1 एप्रिलपासून गृहकर्ज आणि वाहनांवरील कर्जाचे व्याजदर कमी होणार आहेत.

रेल्वे प्रवाशांसाठी नवी सुविधा

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या प्रवासासाठी एक विशिष्ट पीएनआर क्रमांक देण्यात येतो. पण लांब पल्ला गाठण्यासाठी कधी कधी प्रवाशांना दोन रेल्वे बदलाव्या लागतात. या दोन्ही रेल्वे गाड्यांसाठी मिळणारे पीएनआर वेगवेगळे असतात. त्यामुळे कित्येक प्रवाशांची चुकामूक होते. हे टाळ्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दोन रेल्वे प्रवासाकरिता एक संयुक्त पीएनआर दिला जाणार आहे. या नव्या नियमामुळं रेल्वे प्रशासनाला तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशाला पैस परत करणेही सोपे जाणार आहे.

आता पीएफ आपोआप ट्रान्सफर होणार

अनेकदा नोकरी बदलल्यानंतर कर्मचाऱ्यांचा जमा झालेला भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी युनिवर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) नंबरची आवश्यकता असते. पण यंदा 1 एप्रिलपासून पीएफ आपोआप- ऑटोमेटिक ट्रान्सफर करता येणार असून, यासाठी यूएएन नंबरची आवश्यकता भासणार नाही. कर्मचारी भविष्य निधी संस्था (ईपीएफओ) याबाबत नवीन नियम लागू केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *