AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार पडेल या अपेक्षेत चंद्रकांत पाटील कपडे घालूनच तयार असतात : शरद पवार

सरकार पडेल या अपेक्षेत चंद्रकांत पाटील कपडे घालूनच तयार असतात, असा टोला शरद पवार यांनी लगावला. (NCP Sharad Pawar Slam Chandrakant patil)

सरकार पडेल या अपेक्षेत चंद्रकांत पाटील कपडे घालूनच तयार असतात : शरद पवार
| Updated on: Oct 02, 2020 | 6:12 PM
Share

पुणे : सरकार पडेल या अपेक्षने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कपडे घालून तयारच असतात, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.  पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. (NCP Sharad Pawar Slam Chandrakant patil)

राज्याच्या राजकारणात वन फाईन मॉर्निंग अचानक काहीतरी घडेल, अशी भविष्यवाणी चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली होती. पाटील यांच्या याच वक्तव्यावर पत्रकारांनी पवारांना विचारला असता, सरकार पडेल या अपेक्षने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कपडे घालून तयारच असतात, असा टोला पवारांनी लगावला.

“महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष यशस्वीपणे पूर्ण करेल. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना साडेचार वर्ष वाट पाहावी लागेल. पण चंद्रकांत पाटील यांच्या वन फाईन मॉर्निंगला माझ्या  शुभेच्छा”, असंही पवार म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावर बोलताना पवारांवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला देखील पवारांनी उत्तर दिलं. मराठा आरक्षणाबाबत विस्मरण झालं असावं, मलाही थोडीफार माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावला.

मराठा आरक्षणावरिल स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. पार्थ पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर बोलताना “पार्थच काय आणखी 10 जण न्यायालयात गेले तरी त्यांना पाठिंबा देण्याची आमची भूमिका राहणार आहे”, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. यावेळी शरद पवारांनी तिथे तयार करण्यात आलेली कोरोनावरील लस घेतल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.

“मी कोरोनावरील लस घेतली असे लोक म्हणत आहेत, परंतु ते खरं नाही, त्यांच्याकडे (सीरम इन्स्टिट्यूट) आत्ता रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी (आरबीसीजी ट्रिपल बुस्टर) लस आहे. ती लस आज मी घेतली आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील ही लस घेतली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील लस यायला जानेवारी उजाडेल”, असं पवारांनी स्पष्ट केलं.

हाथरस प्रकरणाचा पवारांकडून निषेध

उत्तर प्रदेश सरकारने त्या मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना का दिला नाही? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता?, याचाच अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आणि मूलभूत अधिकार याला काही अर्थ राहिला नाही. महाराष्ट्रात अशा घटना घडल्यावर तात्काळ अ‌ॅक्शन घेतली जाते. पण उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा होतो, अशा कठोर शब्दात पवारांनी निषेध व्यक्त केला. (NCP Sharad Pawar Slam Chandrakant patil)

संबंधित बातम्या

मी आणि माझ्या स्टाफने आज लस घेतली, सीरम इन्स्टिट्यूटच्या भेटीनंतर शरद पवारांची माहिती

केंद्राचा ‘तो’ निर्णय अनुकूल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला शरद पवारांची साथ

हाथरस घटनेवरील जनतेची रिअॅक्शन योग्यच; पवारांची योगी सरकारवर टीका

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.