तुम्ही गर्भवती आहात…आणि तरीही अकोल्होलचं सेवन करता आहात…मग सावधान

तुम्ही गर्भवती आहात...आणि तरीही अकोल्होलचं सेवन करता आहात...मग सावधान
प्रातिनिधीक फोटो

गर्भवती होणं हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. आज महिला कामासाठी बाहेर जायला लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचं स्व:ताचं एक लाईफस्टाईल तयार झालं असतं. अशावेळी 9 महिने बाळाला गर्भात सांभाळणे त्यासोबत शरीरात आणि आयुष्यात होणारे बदल तिला अनेक वेळा झेपत नाही. आज महिला सोशली अल्कोहोलचं सेवन करायला लागल्या आहेत. गर्भधारणा झाल्यावरही अनेक महिला त्यांची ही सवय सोडू शकत नाही. आणि याचा बाळावर गंभीर परिणाम दिसून येतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 19, 2022 | 1:38 PM

आज महिला नोकरीनिमित्त घराबाहेर जायला लागली आहे. महिला आज सर्रास अल्कोहोलचं सेवन करताना दिसून येते. गेल्या काही वर्षात महिलांचं अल्कोहोलचं सेवनचं प्रमाण वाढलं आहे. महिला जेव्हा गर्भवती होते तेव्हा तिला अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते. कारण तिच्या गर्भात वाढणारं बाळ हे तिच्याशी जुळलेलं असतं. त्यामुळे आई जे खाते ते बाळाला मिळतं. म्हणून या 9 महिन्यांचा काळात महिलेच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं जातं. तिने काय खालं पाहिजे काय खालया नको याची तिला कल्पना दिली जाते. या दिवसांमध्ये महिलेने अल्कोहोलचं सेवन पूर्णपणे बंद करायला पाहिजे. अन्यथा बाळावर याचे गंभीर परिणाम दिसून येतात. बाळाला फीटल अल्कोहोल सिंड्रोम हा आजाराची लागण होऊ शकते.

काय आहे फीटल अल्कोहोल सिंड्रोम  (Fetal Alcohol Syndrome)

जर गर्भवती महिलेने अल्कोहोलचं सेवन न सोडल्यास बाळाला फीटल अल्कोहोल सिंड्रोम हा आजार होण्याची दाट शक्यता असते. याला मेडिकलमध्ये एफएएस असंही म्हणतात. यात बाळाच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो. जो ठिक करता येत नाही. तसंच शरीरात काही व्यंग दिसून येतात.

फीटल अल्कोहोल सिंड्रोमचं कारण

जेव्हा गर्भवती महिला अल्कोहोलचं सेवन करते तेव्हा ते नाळेतून बाळापर्यंत पोहोचतं. बाळ हा गर्भात कणकण वाढत असतो. अशावेळी बाळाच्या लिव्हर अल्कोहोल पचनाची क्षमता नसते. त्यामुळे हे अल्कोहोल बाळाचा शरीरात जमा होतं. आणि त्यामुळे बाळा आवश्यक ती पोषकतत्व मिळत नाही. बाळा गर्भात ऑक्सिजनची कमतरता जाणवते. आणि बाळाचा विकास गर्भात थांबतो.

काय आहेत लक्षणं

1. बाळाच्या डोक्याचा आकार नेहमीपेक्षा लहान असतो
2. हे बाळ मोठं झाल्यावर इतरांच्या तुलनेत उंचीने कमी आणि वयाने मोठी दिसतात.
3. यकृत, किडनी, हृदयाच्या कामात अडथळा
4. ऐकण्याची आणि दृष्टी क्षमता कमी
5. बुद्धीमत्ता कमी असते
6. कुठलीही गोष्ट शिकण्यास त्रास होतो
7. पाय, हात आणि बोटामध्ये विकृती
8. मोठी आणि छोटे डोळे
9. भद्दी आणि छोटी नाक
10. कमी वजन

काय आहे यावर उपचार

हा आजार झालेल्या मुलांना बरं केलं जाऊ शकत नाही. मात्र साइकोलॉजिस्ट, स्पीच थेरेपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरेपिस्टने त्याच्यामधील क्षमता वाढवू शकतो. त्यामुळे ज्या महिला अल्कोहोलचं सेवन करत असेल त्यांनी गर्भवस्थेत अल्कोहोलचं सेवन टाळून निरोगी बाळाला जन्म द्यावा.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

Nagpur Crime | नागपुरात प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला; जखमी झालेला प्रियकर पळाला…

Corona Positive MLA | कोरोना पॉझिटिव्ह आमदार आंदोलनात कसे?; हे तर सुपर स्प्रेडर, काँग्रेसचं भाजपावर टीकास्त्र

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें