Nagpur Crime | नागपुरात प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला; जखमी झालेला प्रियकर पळाला…

Nagpur Crime | नागपुरात प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला; जखमी झालेला प्रियकर पळाला...
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

अक्षय आणि पूजा दोघांमध्ये प्रेम होते. पूजा ही घटस्फोटित आहे. अक्षय आपल्याशी लग्न का करत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये वाद झाला. वादाचा रुपांतर चाकूहल्ल्यात झाले. पूजाने अक्षयवर चाकूहल्ला केला.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 19, 2022 | 10:23 AM

नागपूर : अक्षय कृष्णा ढोके (वय 27) हा तीन वर्षांपासून दत्तवाडीत किरायाने राहतो. त्याच्यासोबत मित्र उमरेड तालुक्यातील सिर्सीचे तुषार भोयर व सतीश डेकाटे वाडीत खासगी कंपनीत काम करतात. मकरसंक्रांतीनिमित्त तुषार व सचिन गावाला गेले होते. अक्षय ढोके हा एकटाच रूमवर होता. सोमवारी 17 जानेवारीला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पूजा गोस्वामीसोबत अक्षयचे भांडण झाले. पूजाने अक्षयसाठी आपल्या पतीला घटस्फोट दिला. अक्षयची दोन ते तीन वर्षांपासून पूजाशी मैत्री आहे. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होऊ लागले. अक्षय रूमवर एकटाच असल्याची माहिती पूजाला मिळाली. यामुळे ती रूमवर पोहोचली.

लग्नावरून झाला वाद

माझ्यासोबत लग्न का करत नाही, यावरून दोघांत भांडण झाले. अक्षयने लग्न करण्यास नकार दिल्याने पूजाने चाकूने अक्षयवर सपासप वार केले. यात अक्षयच्या हातावर, मानेवर, पाठीवर तसेच गालावर जखमा झाल्या. चाकूचे वार झेलल्यानंतर त्याने जिवाच्या आकांताने तिथून पळ काढला. पूजाच्या तावडीतून सुटत अक्षय जीव वाचविण्यासाठी दत्तवाडी चौकापर्यंत धावत गेला. चौकातील नागरिकांनी अक्षयला वाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पूजाने अक्षयच्या आईला एकदा फोन केला होता. यावेळी तिने अक्षय माझ्यासोबत लग्न करणार नसेल तर मी त्याला सोडणार नाही, त्याचा जीव घेईन असे सांगितले होते. यातून तिने लग्नाचा तगादा लावून अक्षयवर चाकू हल्ला केला. वाडी पोलिसांनी पूजा गोस्वामी हिला अटक केली. मंगळवारी घटनेचा सखोल तपास करीत वाडी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकव्हर करत आहेत.

Nagpur Crime | क्रिकेटच्या सट्ट्याने केला घात! जुगाऱ्याने अख्खं कुटुंबच संपवलं; नागपुरात नेमकं काय घडलं?

Nagpur Ghatrona | वेकोलिच्या स्फोटांमुळं घरांना तडे!, घाटरोना गावाचे पुनर्वसन होणार काय?

NMC Election | नागपुरात आप कुणाचा वाढविणार ताप; मनपा निवडणुकीत पहिल्यांदाच अजमावणार जोर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें