Nagpur Crime | क्रिकेटच्या सट्ट्याने केला घात! जुगाऱ्याने अख्खं कुटुंबच संपवलं; नागपुरात नेमकं काय घडलं?

Nagpur Crime | क्रिकेटच्या सट्ट्याने केला घात! जुगाऱ्याने अख्खं कुटुंबच संपवलं; नागपुरात नेमकं काय घडलं?
मदन अग्रवाल, त्याची पत्नी व मुलगा.

जुगार किंवा सट्टा या वाईट सवयी आहेत. हे सांगूनही जुगारी काही ऐकत नाहीत. कर्जबाजारी झाल्यानंतर शेवटी काय करायचं असा प्रश्न पडतो. त्यातून मग अख्या कुटुंबालाच संपवण्याचा घाट घातला जातो. अशीच ह्रदयद्रावक घटना काल नागपुरात घडली.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 19, 2022 | 9:00 AM

नागपूर : कर्जबाजारी झालेल्या जुगाऱ्याने पत्नी व दोन मुलांचा चाकूने गळा चिरून खून केला. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजता जरीपटक्यातील दयानंद पार्क परिसरात घडली. किरण अग्रवाल (33), मुलगा वृषभ (10) आणि मुलगी टिया (5) अशी मृतांची नावे आहेत. तिघांना संपवल्यानंतर मदन अग्रवाल (40) या निर्दयी बापाने गळफास लावला. त्यानंतर मुलगा वृषभ आणि मुलगी टिया या दोघांनाही चाकूने भोसकले. तिघांचाही मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर मदनने छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास लावला. वृषभ आणि टिया या दोघांच्याही पोटावर चाकूने अनेक घाव आहेत.

दोन्ही मुलांना आणि बायकोला चाकूने भोसकले

मदन अग्रवाल हा शांतीनगरात राहत होता. त्याचे दयानंद पार्क परिसरात चायनिजचे दुकान होते. मदनने मदनात चूर होऊन प्रेमविवाह केला. त्यामुळे त्याचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. मदनला क्रिकेट सट्ट्याचे व्यसन होते. जुगारात पैसे हरल्याने तीन दिवसांपासून तो तणावात होता. मदनने सोमवारी चाकू विकत आणला. मध्यरात्री पत्नी आणि दोन्ही मुले झोपेत असताना पत्नी किरणच्या गळ्यावर चाकूने वार केला. किरणचा गळा कापलेला आहे.

25 ते 30 लाखांचे होते कर्ज

मदनचा मित्र त्याला भेटायला घरी आला. दार ठोठावल्यानंतर कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याला शंका आली. त्याने शेजाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार तोडले असता दोन्ही मुले आणि किरण एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात दिसले. तर मदन गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. मदन जुगाराशिवाय क्रिकेटवर बेटिंग करायचा. यात हारल्याने त्याच्यावर सुमारे 25 ते 30 लाखांचे कर्ज होते. ते फेडले नाही तर आपले व कुटुंबीयांचे कसे होईल याची भीती त्याला सतावत होती. यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे. काही दिवसांपूर्वी मदन सट्ट्यामुळं मौताज झाला होता. तेव्हा त्याच्या भावाने त्याच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये टाकले होते.

Nagpur Crime | नागपुरातील अल्पवयीन मुलीला युवकाने पळविले; दोन वर्षांनी परतली ती बाळासहच!

Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी; अडीच हजारांच्या उंबरठ्यावर बाधित

आर्वी गर्भपात प्रकरण, अखेर डॉ. नीरज कदम बडतर्फ, पालिकेची कदम रुग्णालयाला नोटीस

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें