आर्वी गर्भपात प्रकरण, अखेर डॉ. नीरज कदम बडतर्फ, पालिकेची कदम रुग्णालयाला नोटीस

अटकेत असलेला डॉ. नीरज कदम हा कंत्राटी डॉक्टर म्हणून आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात जानेवारी 2018 पासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. त्याला 50 हजार रुपये मानधनतत्वावर मिळत होते.

आर्वी गर्भपात प्रकरण, अखेर डॉ. नीरज कदम बडतर्फ, पालिकेची कदम रुग्णालयाला नोटीस
नीरज कदब यांच्यावर अखेर कारवाई
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 9:11 PM

वर्धा : आर्वी (Arvi, Wardha) येथील गर्भपात प्रकरणात आता सगळीकडून कारवाई केली जाते आहे. याप्रकरणात अटक असलेल्या आरोपी डॉ. नीरज कदम याला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी पदावरुन तत्काळ बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी काढले आहे. तर कदम रुग्णालयात बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावल्याप्रकरणी आर्वी नगरपालिकेने रुग्णालयाला नोटीस पाठवली आहे. आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताच्या घटनेने सर्वांचीच झोप उडाली आहे.मागील पाच दिवसांपासून पोलीस विभाग दिवसरात्र पुरावे गोळा करण्याचे काम करीत असतानाच आरोग्य विभागाने कदम रुग्णालयातील चारही डॉक्टरांविरुद्ध सोमवारी रात्री तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी पुन्हा विविध कलमान्वये गुन्हाही दाखल केलाय.

कोण आहे नीरज कदम?

अटकेत असलेला डॉ. नीरज कदम हा कंत्राटी डॉक्टर म्हणून आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात जानेवारी 2018 पासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. त्याला 50 हजार रुपये मानधनतत्वावर मिळत होते. मात्र, शासकीय औषधसाठा त्याच्या खासगी रुग्णालयात आढळून आल्याचा अहवाल टास्कफोर्स चमूने सादर केल्याने तसेच डॉ. नीरज कदम याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने त्यांची सेवा तत्काळ समाप्त करुन त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बसे यांनी दिले आहे.

दुसरीकडे या प्रकरणात बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावल्याची आर्वी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विजय देवळीकर यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी नागपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी कदम रुग्णालयाच्या संचालकाला नोटीस देत तात्काळ खुलासा मागविला आहे.पालिकेच्या पत्रात त्यांनी कदम नर्सिंग होम येथे निर्माण होत असलेला जैव वैद्यकीय कचरा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याकरीता अधिकृत एजन्सीकडे सोपविणे गरजेचे आहे.

परंतु आपण आपल्या नर्सिंग होम मधून निघणारा जैव वैद्यकीय कचरा अधिकृत एजन्सीला सोपवित नसल्याचे, तसेच त्या कच-याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावत नसल्याचे या कार्यालयाचे निदर्शनास आलेले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, संदर्भीय नियमानुसार आपणावर कार्यवाही का करण्यात येवू नये. याचा खुलासा तात्काळ या कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहेत.

संबंधित बातम्या :

रुग्णालयात 12 कवट्या अन् 54 हाडं, घरात काळविटाची कातडी; वर्धा अवैध गर्भपात प्रकरानं खळबळ

Wardha : धक्कादायक! पत्नीनेच पतीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यास सांगितले, वर्ध्यातील आरोपी दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.