बद्धकोष्ठतेने त्रस्त आहात? घरगुती उपायांऐवजी ही ट्रीक करून पाहा…

| Updated on: Mar 27, 2022 | 1:21 PM

अनेक लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त्र आहेत. पोट नीट साफ होत नसल्याने संपूर्ण दिवस खराब जात असतो. अनेकांना सकाळी पोट साफ करताना खूप त्रास सहन करावा लागतो. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे घरगुती उपाय करतात पण तरीही आराम मिळत नाही. अलीकडेच याबाबत एकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकत बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्याचा एक मार्ग सांगितला आहे.

बद्धकोष्ठतेने त्रस्त आहात? घरगुती उपायांऐवजी ही ट्रीक करून पाहा...
बद्धकोष्ठता
Follow us on

मुंबई : बद्धकोष्ठतेचा (constipation) जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना सामना करावा लागतो. बद्धकोष्ठतेच्या समस्येला तोंड देण्यासाठी लोक विविध घरगुती उपायांचा (home remedies) अवलंब करतात पण तरीही यातून काहीच उपायोग होत नाही. बदलती जीवनपध्दती, चुकीच्या जेवणाच्या सवयी, सकस आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव आदी विविध कारणांमुळे बध्दकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागत असतो. अनेक जण यावर महागडे उपचारदेखील घेतात, परंतु तरीही या समस्येपासून आराम मिळत नाही. पण अलीकडेच एका तज्ज्ञाने याबाबत सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट टाकली आहे. यातून तुमची बद्धकोष्ठता ही समस्या चुटकीसरशी बरी होऊ शकते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी अनेक टिप्स आणि युक्त्या आहेत.

डॉ. कॅली पीटरसन यांनी बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर कॅलीचे खाते ‘बेली व्हिस्परर’ म्हणून परिचित आहे. कॅली सांगतात, की बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट तुमच्यासोबत टॉयलेटमध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. डॉ. केली पीटरसन पेल्विक, व्हिसरल आणि ऑर्थोपेडिक फिजिकल थेरपीमध्ये पारंगत आहे. डॉ. कॅली सांगते की, जेव्हा जेव्हा रुग्ण बद्धकोष्ठतेची समस्या घेऊन त्यांच्याकडे येतात तेव्हा त्या त्यांना टॉयलेटमध्ये ‘स्ट्रॉ’ वापरण्याचा सल्ला देते.

असा करा ‘स्ट्रॉ’चा वापर

डॉ. कॅली यांनी सांगितले, की जेव्हाही तुम्ही पोट साफ करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही स्ट्रॉ घेउन बाहेर फूक मारण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुम्हाला खूप मदत होईल. त्या म्हणाल्या, बद्धकोष्ठतेची समस्या सामान्यतः तेव्हा उद्‌भवते जेव्हा तुम्ही अन्नामध्ये फायबरचे सेवन करत नाही किंवा कमी प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करतात. पण काही वेळा औषधांमुळेही बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होत असते.

ही कारणे आहेत कारणीभूत

– एकाच जागी बराच वेळ बसणे
– तणाव किंवा चिंताग्रस्त असणे
– शौचालयात जाण्याने दुर्लक्ष करणे

डॉ. कॅली पीटरसन यांनी सांगितले की,‘स्ट्रॉ’वापरल्याने तुमचा श्वास नियंत्रित ठेवता येतो, ज्यामुळे तुम्हाला आतड्याची हालचाल करणे सोपे होते. त्याच्या इंस्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर करताना त्यानी सांगितले की, जेव्हाही तुम्ही पोट साफ करण्यासाठी टॉयलेटमध्ये जाता तेव्हा मेणबत्ती विझवण्यासाठी आपण जशी फूक मारतो, तशीच ‘स्ट्रॉ’मधून फूक मारावी. यासाठी आपल्याला ‘डायाफ्रामॅटिक’ श्वास घेण्याची आवश्यकता असेल. याला बेली ब्रीदिंग असेही म्हणतात. यामध्ये, डायाफ्राम आणि पोटातून खोल श्वास घेतला जातो. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा प्रत्येक श्वासाने डायाफ्राम खाली खेचता, व त्यातून फुफ्फुसांना चांगले काम करण्यास मदत करते. डायाफ्रामॅटिक श्वासोच्छवासाद्वारे श्वास घेणे आणि सोडणे यामुळे ओटीपोटाच्या स्नायूंमध्ये आकुंचन होते, ज्यामुळे पाठीच्या करण्यावर ताण येतो. डॉ. पीटरसन यांनी सांगितले की, या उपायासोबतच आहारात फायबर युक्त गोष्टींचा समावेश करून बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते. या ‘स्ट्रॉ’च्या ट्रीकमुळे पोट साफ होण्यास मदत मिळते.

संबंधित बातम्या :

योगा करताना ‘या’ गोष्टींची माहिती तुम्हाला असायलाच हवी

तुमच्या स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ कधीच एक्सपायर होत नाहीत…

काय सांगता…टाईप-2 मधुमेह 90 दिवसांमध्ये बरा होता…जाणून घ्या यासाठी डाॅक्टरांनी नेमक्या कोणत्या टिप्स फाॅलो करायला सांगितल्या आहेत!