उच्च रक्तदाबावर रामबाण अस्त्र; पतंजली बीपी ग्रिट वटीचा फायदा जाणून घ्या

BP Grit Vati Patanjali Remedies : आधुनिक जीवनशैली आणि बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळे रक्तदाबाची समस्या वाढत आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना नियमीतपणे औषधं घ्यावी लागतात. पतंजलीच्या दाव्यानुसार, त्यांच्या आयुर्वेदिक औषधांमुळे बीपीचा आजार नियंत्रित करता येईल.

उच्च रक्तदाबावर रामबाण अस्त्र; पतंजली बीपी ग्रिट वटीचा फायदा जाणून घ्या
पतंजली बाबा रामदेव
Image Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: May 10, 2025 | 4:16 PM

रक्तदाब ही आता सर्वांनाच भेडसावणारी समस्या ठरत आहे. कमी अथवा अधिक उच्च रक्तदाब हा शरीराला नुकसानदायक ठरतो. बीपीमुळे होणारे बदल लागलीच समजत नाही. काही वेळा सततची डोकेदुखी आणि श्वास फुलणे, दम लागणे यातून रक्तदाबाची माहिती होते. हाय बीपी अथवा हायपरटेन्शन गेल्या काही दिवसातील गंभीर समस्या म्हणून समोर येत आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने औषध घ्यावे लागते. ॲलोपॅथिक पद्धतीने हाय बीपीसाठी काही औषधं आहेत. त्यांना नियमीत सेवन करावे लागते. पण आयुर्वेदात या रोगावर सोपा इलाज आहे.

पतंजली संशोधन संस्था, हरिद्वारने आपल्या संशोधनात, असा दावा केला आहे की, आयुर्वेदिक औषध दिव्य बीपी ग्रिट वटी हाय बीपीची समस्या अत्यंत सोप्या पद्धतीने नियंत्रित करते. त्यामुळे रक्तदाबाची समस्या कायमची नियंत्रित राहते. या औषधाच्या सेवनामुळे बीपीची समस्येतून सुटका होते. या शोधातील दाव्यानुसार, हे औषध उच्च आणि कमी उच्च रक्तदाबावर काम करते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली नियमीत रुपात एका निश्चित कालावधीत बीपी समस्या केवळ नियंत्रितच होत नाही तर हा आजार समूळ नष्ट होतो.

दिव्य बीपी ग्रिट वटीचे ( BPGRIT Vati) अनेक फायदे

संशोधनानुसार, पतंजलीच्या दिव्य फार्मेसीने दिव्य बीपी ग्रिट वटी नावाने हो औषध बाजारात आणले आहे. हे औषध केवळ रक्तदाबातच उपयोगी आहे असे नाही तर शारिरीक थकवा आणि चक्कर येणे यासारखी अडचण पण ती दूर करते. याशिवाय हृदयाचे ठोके सुरळीत करण्यासाठी मदत करते. न्यूरोसिस, भीती आणि अस्वस्थेतेविरोधात हे प्रभावी औषध आहे. या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाही. त्यामुळे हाय बीपीचे रुग्ण याचे सहज सेवन करू शकतात.

कोणते आयुर्वेदिक घटक?

दिव्य बीपी ग्रीट वटीमध्ये अर्जुन, गोखरू, डाळिंब, लसण, दालचिनी आणि गुगळ यांचा समावेश करण्यात आला आहे. आयुर्वेदातील या जुडीबुटीत एका निश्चित प्रमाणात औषध मात्रा आहे. हे औषध बीपीच्या समस्येत अत्यंत उपयोगी आहे. या औषधाच्या सेवनामुळे बीपीची समस्या नियंत्रित करता येते. ही सर्व जुडीबुटी एका निश्चित प्रमाणात दिव्य बीपी ग्रीट वटीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. रुग्ण सकाळी आणि संध्याकाळी दोन या प्रमाणात नियमीतपणे या गोळ्या तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार घेऊ शकतात.