AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फायदे वाचलेत तर रोज प्याल हळदीचं दूध!

दुधात हळद टाकल्याने त्याची ताकद दुप्पट होते. हिवाळ्यात लोक हळदीच्या दुधाचे सेवन करतात. पण रोज हळदीचं दूध प्यायल्यास अनेक फायदे मिळतात. होय, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हळदीचे दूध पिण्याचे फायदे काय आहेत.

फायदे वाचलेत तर रोज प्याल हळदीचं दूध!
Turmeric milkImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 04, 2023 | 6:12 PM
Share

मुंबई: दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे की दुधात हळद टाकल्याने त्याची ताकद दुप्पट होते. हिवाळ्यात लोक हळदीच्या दुधाचे सेवन करतात. पण रोज हळदीचं दूध प्यायल्यास अनेक फायदे मिळतात. होय, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हळदीचे दूध पिण्याचे फायदे काय आहेत.

हळदीचे दूध पिण्याचे फायदे

वेदना दूर होतात

रोज रात्री हळदीचे दूध प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. अशावेळी जर तुम्हालाही सांधेदुखीचा त्रास होत असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्या. हे दूध प्यायल्याने जळजळ होण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

हळदीचे दूध प्यायल्याने पोटातील अल्सर आणि तोंडाचे अल्सर देखील दूर होतात. त्याचबरोबर जर तुम्हाला आतड्यांशी संबंधित समस्या असतील तर दररोज हळदीचे दूध प्यावे. हळदीचे दूध प्यायल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत

हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हाडेही मजबूत होतात. त्यामुळे जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिऊ शकता.

स्मरणशक्तीसाठी सगळ्यात भारी

हळदीचे दूध प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. रोज याचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते आणि तुमची विचार करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यावे. त्याचबरोबर जर तुमचं डोकं नेहमी दुखत असेल तरीही तुम्ही हळदीचे दूध पिऊ शकता.

पचनशक्ती मजबूत

हळदीचे दूध प्यायल्याने तुमची पचनक्रिया मजबूत होते. त्याचबरोबर तुमचे अन्नही सहज पचते. त्यामुळे तुम्हीही रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायले तर पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.