उकडलेले अंडे की ऑम्लेट ? कुठले अंडे खाल्ल्याने वजन वेगाने घटते ?

अंडी नेहमीच शरीराला आवश्यक प्रोटीन मिळवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. थंडीत अंडी खाणे नेहमीच चांगले मानले जाते. परंतू तुम्ही वजन कमी करत असाल तर उकडलेले अंडे बेस्ट की ऑम्लेट केलेले ते पहा...

उकडलेले अंडे  की ऑम्लेट ? कुठले अंडे खाल्ल्याने वजन वेगाने घटते ?
omelette vs boiled eggs
| Updated on: Nov 12, 2025 | 7:35 PM

अंडी वजन कमी करण्याचा सोपा आणि स्वस्त मार्ग म्हटला जातो. याचे कारण अंड्यात अनेक व्हिटामिन्स , मिनरल्स तर असतात शिवाय प्रोटीनचाही तो चांगला स्रोत असतो. परंतू हे केवळ यावर अवलंबून नसते की तुम्ही अंडी खाता की नाही ? त्याऐवजी अंडी तुम्ही उकडून खाता की ऑम्लेट फ्राय करुन खाता यावर ते अवलंबून असते. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नल ऑफ एग्रीकल्चरल एण्ड फूड केमिस्ट्रीमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. अंड्याला कशा प्रकारे खाल्ल्याने त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो आणि वजन घटवण्यात अंडी कशी मदत करतात पाहूयात.. वजन घटवण्यात उकडलेले की ऑम्लेट केलेले अंडे उपयुक्त पाहूयात….

काय म्हणते संशोधन ?

अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नल ऑफ एग्रीकल्चरल एण्ड फूड केमिस्ट्रीत प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार अंड्याला शिजवण्याची पद्धत सांगते की अंड्यांत असलेल्या प्रोटीनचे शोषण आणि पचन कसे होणार ते…चला तर जाणून घेऊयात अंडी वजन कमी करण्यात अधिक मदत कशी करतात ते..

संशोधनानुसार जेव्हा अंड्याला उकडले जाते तेव्हा त्यात तेलाचा वापर केला जात नाही. आणि त्यात एक्स्ट्रा कॅलरीज देखील असत नाही. उकडलेले अंड्यात त्याचे प्रोटीनची बनावट स्थिर रहाते. ज्याचा शरीर सहजपणे उपयोग करु शकतो. तर जेव्हा अंड्याचे ऑम्लेट बनवतात तेव्हा त्यात तेल, तूप किंवा लोण्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे त्यात एक्स्ट्रा कॅलरी वाढते. तसेच काही लोक ऑम्लेटमध्ये चीझ,वा प्रोसेस्ड मीट देखील टाकतात, त्यामुळे त्यात फॅट आणि सोडीयमचे प्रमाणही वाढते.

काय आहे अधिक फायद्याचे ?

उकडलेले अंडे वजन कमी करण्यासाठी अधिक सहाय्य करते असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तर ऑम्लेट शरीराला एक्स्ट्रा कॅलरी देऊ शकते. उकडलेल्या अंड्यात लो कॅलरी असते आणि ते हाय प्रोटीनचा सोर्स असते. यामुळे पोट अधिक वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. उकडलेल्या अंड्यासाठी तेल किंवा लोणीचा वापर होत नाही. त्यामुळे कॅलरी एक्स्ट्रा शरीरात जात नाही. यामुळे वर्कआऊटनंतर रिकव्हरीत मदत मिळते. कारण ते लवकर पचते.

जर तुम्ही वजन कमी करु इच्छीत असाल तर आपल्या डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढण्यासाठी अंड्यांचा समावेश डाएटमध्ये करु शकता. तुम्हाला दररोज किती अंडी खायची आहेत यासाठी तुमच्या सर्टीफाईड ट्रेनर वा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला विचारु शकता.