मुलांचा मेंदू होईल कॉम्प्युटरपेक्षा वेगवान, सहा महिन्यानंतर सुरु करा ही सुपरफूड्स

मुल सहा महिन्यांचे झाल्यानंतर त्यांना ठोस आहार देण्यास सुरुवात केली जाते. यावेळी लहानमुलांच्या आहारात पोषक पदार्थांचा समावेश केल्याचे त्यांची बुद्धीत तल्लख होण्यास मदत होते.

मुलांचा मेंदू होईल कॉम्प्युटरपेक्षा वेगवान, सहा महिन्यानंतर सुरु करा ही सुपरफूड्स
SUPER FOODS
| Updated on: Aug 14, 2026 | 5:08 PM

मुलांच्या आरोग्य आणि विकासा संदर्भात पालक नेहमीच चिंता करत असतात. जेव्हा मुल सहा महिन्याचे असते, तेव्हा त्याला हळूहळू ठोस आहार देण्यास सुरुवात केली जाते.त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या प्लेटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याचा निर्णय पालकांनी घ्यायचा असतो. या वयात केवळ पोट भरणे पुरेसे नसते. तर मुलांना पौष्टीक अन्न देणे गरजेचे असते.त्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात या आहाराची महत्व असते.

मुलाचा मानसिक विकास त्याच्या आहार, झोप, खेळणे, बातचीत, आजूबाजूचा माहोल आणि देखभाल सह अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. परंतू काही पोषक खाद्य पदार्थ मुलांच्या डाएटमध्ये सामील केल्यास त्याचा विकास चांगल्या प्रकारे होतो. चला तर पाहूयात हे पदार्थ कोणते आणि त्याचे फायदे काय ?

अक्रोडपासून प्यूरी वा पाउडर

अक्रोड मुलांसाठी पोषक आहार मानला जातो. यात हेल्दी फॅट्स असतात आणि हा प्लांट – बेस्ड ओमेगा-3 फॅटी एसिडचा देखील स्रोत आहे. ओमेगा-3 फॅट शरीर आणि मेंदूच्या सामान्य विकासासाठी महत्वपूर्ण पोषक तत्वात सामील आहे. याशिवाय अक्रोडमध्ये एंटीऑक्सीडेंट कंपाऊंड देखील आढळतात. सहा महिन्यानंतर मुलांना अक्रोडचे थेट तुकड्यांच्या रुपात देण्याच्या ऐवजी बारीक-बारीक वाटलेल्या रुपात देणे योग्य असते. अक्रोडला हलके भाजून त्याची पावडर तयार करा. यात मुलांसाठी तयार केलेल्या दलिया, दही वा कोणा फळाच्या प्युरीत थोड्या प्रमाणात मिक्स करावे.

मोठे आकाराचे तुकडे लहान मुलांना गिळताना त्रास होऊ शकतो तसेच त्यांना धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलांचे वय आणि त्यांच्या गिळण्याची क्षमता यानुसार या पदार्थांचे तुकडे बारीक करावेत. पहिल्यांदा एखादा नवा खाद्य पदार्थ देताना एलर्जी होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे नीट काळजी पूर्वक लक्षणे पाहून त्या पदार्थांची निवड करावी.

राजगीरात देखील पोषक तत्व

राजगीऱ्याचा देखील लहान मुलांच्या आहारात समावेश करता येतो. यात प्रोटीन, आयर्न आणि मॅग्नेशियम सारखे पोषक तत्वे असतात. आयर्न लहान मुलांच्या सामान्य वाढ आणि शरारातील आवश्यक प्रक्रियांसाठी महत्वपूर्ण आहे. तर प्रोटीन शरीराच्या पेशी आणि विकासात महत्वाची भूमिका बजावते. मुलांसाठी राजगीरा तयार करताना चांगल्या प्रकारे शिजवणे गरजेचे असते. म्हणजे ते संपूर्णपणे नरम होईल आणि मुलांना गिळणे सोपे होईल. यात चांगल्या प्रकारे मॅश केलेल्या भाज्यांचा समावेश करावा. चवीला थोडे गोड होण्यासाठी वेगवेगळ्या पोषक तत्वांना जोडण्यासाठी रताळ वा सफरचंदच्या प्युरीचा समावेश करु शकता.

मणूके

किशमिश अनेक तत्वांनी भरपूर असते. यामुळे रक्त वाढते आणि कॅल्शियम, फायबर आणि आयर्न देखील मिळते. त्यामुळे लहान मुलांच्या आहारात मणूके म्हणजेच किशमिशचा समावेश करावा.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us