AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार हिरामण खोसकर यांच्या मुलाची शिवसेना तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, महायुतीत वादाची ठिणगी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल…

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे महायुतीतील राष्ट्रवादी अजितदादा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना या दोन पक्षाच्या नेत्यातच कलगीतुरा सुरु झाला आहे.

आमदार हिरामण खोसकर यांच्या मुलाची शिवसेना तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, महायुतीत वादाची ठिणगी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल...
MLAs Hiraman Khoskar and Vaman Khoskar
| Updated on: Aug 14, 2026 | 5:54 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा मुलगा वामन हिरामण खोसकर यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. खोसकर याच्या मुलाने त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा या कथित व्हायरल क्लिपमधून स्पष्ट झाले आहे. या संदर्भात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख रविंद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे इगतपुरी – त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर यांच्यावर जीवे मारण्याचा गंभीर आरोप होत आहे. या संदर्भात शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भोये यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामुळे महायुतीतच वादाची ठिणगी पेटली आहे.

आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन हिरामण खोसकर यांची एक क्लिप व्हायरल होत आहे. यात ते शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भोये यांना शिवीगाळ करताना ऐकायला येत आहे. या प्रकरणात त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भोये यांनी पोलिसांत वामन खोसकर यांच्या विरोधात थेट तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणामुळे अजितदादांचा राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातच कलगीतुरा लागल्याचे स्पष्ट होत आहे. ही क्लिप सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आहे. या क्लिपला टीव्ही ९ मराठी चॅनलने दुजोरा दिलेला नाही. या संदर्भात स्वत: रविंद्र भोये यांनीच पोलिसांकडे तक्रार केली आहे.

जीवे मारण्याच्या धमक्या

रविंद्र भोये यांनी या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवली आहे. वामन हिरामण खोसकर यांनी आपल्या शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे रविंद्र भोये यांनी या तक्रारीत म्हटले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात आपण आवाज उठवत असल्यानेच आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा रविंद्र भोये यांनी केला आहे.

Follow Us
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!